________________
११२ मोरोपंतकृत करून दिला आहे. येणेकरून भगवत्स्तवनाची स्वकल्याणास आवश्यकता दर्शवून अल्पप्रयासाचे महत्फलही प्रकट केले आहे.' [य० पां०-पृ० १६५]. चतुर्थ चरणांत पांखराने तोंड उघडल्याविना त्याच्या तोंडांत मेघोदक पडावयाचें नाहीं असें वर्णिले आहे. येथे पांखरू पदाचे प्रतिद्वंद्वी पद मोरोपंत कवि आणि घनांबु पदाचें ईशप्रसाद यांचे निगरण आहे म्हणून येथें रूपकातिशयोक्ति अलंकार आहे. 'जरि निगरण विषयाचे करुनि विषयित्व निश्वया करिती । तरि अतिशयोक्ति म्हणती तिस रूपक याहि उपपदा धरिति' ॥ उ०-निघती सुतीक्ष्ण शर हे नीलनवांबुज युगांतुनी पाहे ॥ 'वर्णनीय विषयाचा त्याचे वाचकशब्दाने उल्लेख नसोन उपमानवाचक शब्दाने ग्रहण करणे याचें नांव विषयनिगरण. अशा प्रकारे विषयाचे निगरण करून उपमानाच्या ऐक्याने त्याचा ऐच्छिक निश्चय केला असतां रूपकातिशयोक्ति अलंकार होतो. जसें नीलकमल आणि शर (वाण) या शब्दांनी नेत्र व कटाक्ष यांचे ग्रहण करून कमल व बाण यांशी त्यांच्या ऐक्याचा निश्चय केला आहे. यास रूपक हे विशेषण देण्याचे कारण रूपकांत दाखविलेल्या सर्व प्रकारांचा हिजमध्येही संभव आहे असे सादृश्याने दाखविणे हे होय. त्यामुळे येथे ही अभेदातिशयोक्ति आणि ताद्रूप्यातिशयोक्ति असे दोन प्रकार होतात' (अ० वि०). उदाहरणे:-(१) 'घालू पाहसि दंष्ट्रा उपडाया अहिमुखांत आंगोळी' (विराट ४-१३), (२) 'हरिच्या पुनः पुन्हा का काड्या नाकात घालिसी शशका। यश काय पक्षिपतिचें येइल हे चार करुनियां मशका?' ॥ (उद्योगपर्व). रूपकातिशयोक्ति हा अलंकार रूपकाचाच एक भेद आहे. त्यांत व ह्यांत भेद इतकाच की, रूपकांत उपमान व उपमेय ह्या दोहोंचाहि उल्लेख असतो. रूपकातिशयोक्तींत उपमेयाचा उल्लेख मुळीच नसतो. ह्या अलंकाराचें तसेंच रूपकाचे पर्यवसान सादृश्यातिशयाकडे आहे. ६. या चरणांत उद्योगाचे जे तत्व प्रतिपादिले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. उद्योगः-कोणतेही कार्य पार पाडण्यास स्वोद्योग पाहिजे, ईश्वरप्रसाद मिळवावयाचा असला तरी स्वोद्योग पाहिजे, स्वोद्योग नसेल तर कार्यसिद्धि व्हावयाची नाही, चातकाला जर मेघोदक पाहिजे तर त्याने तोंड उघडले पाहिजे, एरवीं तें प्राप्त व्हावयाचे नाही. God helps those who help themselves ह्या आशयाचा वरील चरण आहे. संस्कृत वचनेंही अशा अर्थाची अनेक आहेत:-(१) दैवं पुरुषकारेण साध्यसिद्धिनिबंधनम्. (२) न स्वयं दैवमादत्ते पुरुषार्थमपेक्षते. (३) उद्यमेन हि सिद्धयंति कार्याणि न मनोरथैः । नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशंति मुखे मृगाः॥ (४) उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीर्दैवेन देयमिति कापुरुषा वदंति। पंतांच्या काव्यांत अशी नीतिमार्गप्रदर्शक वचनें पुष्कळ आढळतात. पंतांचे काव्य हे उदात्त विचारांचे आणि उन्नत नीतितत्त्वांचे मनोहर मंदिर होय असे म्हटले तरी चालेल. या केकेंत 'प्रसाद' गुण साधला आहे. काव्याचे गुण प्रमुख्यत्वें तीन आहेतः-माधुर्य, ओज आणि प्रसाद. ज्या काव्यरचनाविशेषापासून अंतःकरणास द्रव उत्पन्न करणारा आल्हाद उत्पन्न होतो तो माधुर्य होय. हे माधुर्य संभोगशृंगार, करुण, विप्रलंभश्रृंगार ह्या रसांत अनुक्रमें अधिकाधिक असते. अंतःकरणाचें दीपन अथवा विस्तार करणारा गुण ओज. हा गुण वीर, बीमुत्स आणि रौद्र ह्या रसांत क्रमाने अधिकाधिक असतो. वाळलेल्या लांकडांस जसा अग्नि लवकर व्यापून टाकतो त्याप्रमाणे शब्द ऐकतांच अर्थबोध होऊन जो तत्काळ चित्ताला व्यापून टा