पान:केकावलि.djvu/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. ११३ शिवे न तुझिया पैदा अदयताख्य दोष क्षण; प्रभो! चुकतसों, तरी करिसि तूंचि संरक्षण. । कतो तो प्रसाद गुण समजावा. हा गुण सर्व रसांत सारखाच आढळतो. प्रसाद गुणाला अनुकूल अशी पदरचना अथवा रीति पांचाली होय. दोन तीन पदांपर्यंतच फत्त जेथें समास असतात तेथें ही पांचाली रीति मानतात. ज्या रचनेत समासयुक्त शब्द मुळीच नसतात व असले तरी क्वचित् असतात, ती वैदर्भी रीति जरि मुख्यत्वें माधुर्यगुणाची व्यंजक आहे तरी ती प्रसादगुणाला प्रतिकूल नाही. याप्रमाणे माधुर्य, ओज व प्रसाद असे तीन प्रधान काव्यगुण असून वैदी, गौडी व पांचाली ह्या अनुक्रमें त्या त्या गुणाच्या व्यंजक रीति मानल्या आहेत. ७. पक्ष्याने, अर्थसंदर्भानें चातकपक्ष्याने. 'पांखरूं' हा शब्द संस्कृत ‘पक्ष' (पंख) यापासून निघाला आहे. संस्कृत शब्दांतील 'प' किंवा 'क्ष' यास 'ख' आदेश होतो. जसें रक्षा-राख, हर्ष=हरीख, परीक्षा-पारख इत्यादि. १. स्पर्श. (प्रास्ताविक):-'माझे मागील अनेक अपराध आठवून तुम्ही माझ्या कवितावधूचा स्वीकार करणार नाही आणि माझी उपेक्षा कराल, असें म्यां ३४ व्या केकेंत म्हटले, ही माझी चूक आहे, यांत तुम्हाकडे निर्दयतादोष येत नाहीं;' असा स्वाभिप्राय व्यक्त करून मागील केकेंतील सिद्धांताचें समर्थन करित होत्साते कवि म्हणतात. 'प्रभो! अदयताख्य दोष तुझिया पदा क्षण न शिव; [हे प्रभो!] चकतसों, तरी तूंचि संरक्षण करिसि, अद्यापि ती शरणागती घडलि नसेचि [हेच] सत्यः विषय रुचे; ज्यां अमृत मिळे, ते मद्या न पिती' असा अन्वय. २. तुझ्या. 'झाल्या, केल्या, त्याच्या, माझ्या, तुझ्या इत्यादि शब्दांचे संयोगकृत कठोरत्व कमी करण्याकरितां किंवा छंदांच्या अनुरोधाने या शब्दांची कवितेत झालिया, केलिया, त्याचिया, माझिया, तुझिया अशी रूपे करतात.' [पद्यरत्नावली-मराठी कवितेंतील व्याकरणाचे विशेष.] याजविषयी आणखी उदाहरणे मागें केका १८, पृ० ५२, टीप ३ पहा. ३.प. दाला, पायाला. पायांला शिवत नाहीं मग आंगाला कोठून शिवणार-असे तात्पर्य यांत 'काव्यापत्ति' अलंकाराची छटा आहे. येथे पायास शिवत नाही असे सांगत कवीने आपली विनयोक्ति दर्शविली. ४. अदयता आहे आख्या (संज्ञा) यानी र्दयतासंज्ञक दोष (दूषण), ज्याला निर्दयपण असे म्हणतात तें दषण, ५. - रहि. ईश्वर अत्यंत सदय आहे, तो निर्दय आहे असा शब्द त्याला कोणाच्यानेही क्षणमात्र लावितां येणार नाही. ६. चुकतों, अपराध करितों. आम्ही मनुष्ये वारंवार अपराध करितों तरी आम्हास दंड न करितां, उलट तूं सर्व अपराध पोटांत घालून आमचे चांगल्या रीतीने संरक्षणच करितोस. तूं सदय मनाने आमचा प्रतिपाळ करतोस, तिव्हां तुला निर्दय कोण म्हणेल?-आतां तुझ्या दयेचा लाभ आम्हांस होत नाही याचे कारण आम्ही तुला अनन्यभावाने शरण येत नाही हेच होय. या केतील पहिल्या दोन चरणांशी खिस्ती शास्त्रांतील पुढील पद्य अत्यंत समानार्थक आहे.- To that