Jump to content

पान:केकावलि.djvu/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. म्हणोनि इतुकेंचि हे स्वहितकृत्य जीवांकडे. । प्रसाद करितां नसे पळ विलंब बापा! खरें, - घनांबु न पडे मुंखीं उघडिल्याविना पांखरें. ॥ ४० केकावलीत सर्वत्र वर्णिलेल्या प्रभूच्या गुणांचा स्पष्ट निर्देश केला आहे. या संबंधी केकावलीवरील आपल्या रिपोर्टीत रावबहादूर रानडे म्हणतात. रा० ब० रानडे यांचा अभिप्राय:Those attributes of the Deity which have a prominent bearing on the devotional aspect of human faith, his all forgiving temper, his zeal to serve those who seek his help and place their faith in him; bountifulness and extreme condescension, all these are celebrated as they deserve in successive stanzas of this hymn.' 'शरण येणे' हा धातु चमत्कारिक अर्थाचा झाला आह. मुळी शरण म्हणजे आश्रय. कोणेकापाशी जाऊन, 'तूं मला आश्रय हो' अर्थात् 'माझें रक्षण कर,' असे म्हणणे. संस्कृतामध्ये 'त्वां शरणं गतोऽहम्' म्हणजे-'तूं जो शरण म्हणजे आश्रय त्यापाशी मी आलों' असा अर्थ होतो. पण चालू मराठी भाषेत 'शरण' शब्दाचा संबंध काकडे आहेसा भास होतो, आणि त्याचा अर्थनिराश्रित दीन मनुष्य आश्रयासाठी आलेला-असा झालेला आहे. याच अर्थाने पंतांनी येथे तो शब्द योजिला आहे. 'तुम्हा शरण आजि आलों' [केका २९ द्वितीय चरण.] ५. प्रतिकूळ. वंक, वक्र, वांक, वांकडा हा अपभ्रंशक्रम. १. यास्तव, आपण शरणागताची उपेक्षा करीत नाही हे सत्य आहे म्हणून, शरणागतावर अनुग्रह करण्यास आपण सदा दक्ष असतां यास्तव. २. प्राण्यांकडे. मनुष्यांकडे आपल्या हिताचे कृत्य इतकेंच आहे की भगवंताला अनन्यभावाने शरण जावें. ईश्वरपराङ्मुख आणि संसारमग्न अशा मनुष्यांनी स्वहित साधण्यासाठी परमेश्वराला शरण जावे इतकेंच त्यांचे कर्तव्य आहे. ३. आम्ही भक्तजन तुम्हाला शरण आल्यावर, तुम्ही प्रसाद करण्यास पळमात्रही (विलंब) उशीर लावीत नाहीं. शरण जाण्याचा मात्र उशीर, आम्ही शरण गेलों की आपण लागलेच प्रसाद (कृपा) करतां ही गोष्ट खरी आहे. ४. हे देवा! मराठी कवितेतून हा शब्द 'प्रेम' किंवा 'लडिवाळपणा' दाखविण्यासाठी योजिलेला आढळतो. ५. मेघोदक. पावसाचे पाणी. 'आम्ही शरण गेलों नाही तर तुम्ही तरी काय कराल?' अशी आशंका धरून कवि म्हणतात. पांखरें (पांखराने-चातकपक्ष्याने) उघडिल्याविना (तोंड उघडल्यावांचून) [त्याच्या मुखीं (तोंडांत) घनांबु (घनाचे उदक,) न पडे (पडत नाहीं). 'यद्यपि पाऊस सर्वत्र पडतो, आणि चातकाच्या मुखांत पडावे असेंही त्याचे धोरण असते,तथापि त्या पक्ष्याने तो पावसाचा थेंब घेण्याला आपले तोंड तर उघडले पाहिजे; तसें आपण घनासारिखे दयाळु आहां खरे, परंतु आम्ही पामरांनी स्वोद्धारार्थ आपली प्रार्थना ____ तर केली पाहिजे, इतकेंही आम्हीं न केले, तर आपण काय कराल ? आम्हीच दोषी होऊ. हा एथें दृष्टांत अलंकार जाणावा. एथें कवीने हा चातकपक्ष्याचा दृष्टांत फार सौरस्यें