पान:केकावलि.djvu/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ मोरोपंतकृत किया विदुरमंदिरीं ह्मणति साधु आस्वादिल्या, खरे जरि, केशा तुज प्रभुसि आपुल्या स्वा दिल्या ? ॥ ३८ पदर पसरुनी जोडिले स्वल्प पोहे;॥ या दीनोपायनातें बुधजन भगवान् प्रीतिने फार गोडी। आणूनि श्रोत्रवक्त्री भरिल, बहु दया मानुनी तेही थोडी, (कृष्णविजय, पूर्वार्ध-सज्जनप्रार्थना). ६. तूं जरी सभाग्य (श्रीमंत, भाग्यशाली आहेस) तरी सुनय (नीतिमान् , विनीत, आणि) आप्त (सखा, हितकर्ता आहेस) तेव्हां कां मातसी (म्यां गरीबाने दिलेल्या वस्तूचा स्वीकार करण्यास कां माजशील?-माजणार नाहींस-असे या प्रश्नाचे अपेक्षित उत्तर आहे. ७. मातणें मत्त होणे, माजणे, धिक्कार करणे. १. साधु म्हणतात की देवाने विदुराच्या घरी कण्या भक्षिल्या. २. कथासंदर्भ:भगवान् श्रीकृष्ण विदुराच्या घरी एकदां गेले तेव्हां विदुर घरी नसून त्याची पत्नी मात्र होती. कृष्णांनी 'मला भूक लागली, काही खावयाला दे' म्हणून विदुराच्या बायकोजवळ, म्हटल्यावरून तिनें भगवंतास तांदुळांच्या कण्या खावयास दिल्या. ह्या कथेचा उल्लेख तुकारामादि अर्वाचीन कवींनी बऱ्याच ठिकाणी केला आहे. ही कथा भागवत, हरिवंश, भारत यांत आढळत नाही. पांडवांकडून कृष्ण हस्तिनापुरास शिष्टाईस गेले तेव्हां ते विदुराच्या घरी उतरले होते व तेथे त्यांनी मोठ्या प्रेमानें भोजन केले. अशी कथा मात्र उद्योगपर्वांत वर्णिली आहे. पंतांनी या प्रसंगा र ट स वर्णन केले आहे. पुढील गीति पहा:-'विदुरप्रेमें जेवि, ब्रह्मादि कवि प्रसन्न यशाने । प्रभुल ८ करिती व्यासादिक विप्र सन्नयज्ञानें. ॥१॥ शतसंख्य वाजवी ज्या जेववितां माय देवकी चिटक्या,। तो नित्यतृप्त भगवान् विदुरगृहीं भोजनांत दे मिटक्या. ॥२॥ आले डेकर, दिधल्या मिटक्या बहुसाल मारिले भुरके, । उरके सर्वांमागुनि अशन, परि न ताट चाटणे उरके. ॥३॥ ज्याच्या चरणे स्वरजाकरविं प्रणतांसि मोक्ष देवविला । देव विलासमनुजतनु विदुरप्रेमें यथेष्ट जेवविला.' ॥४॥ [उद्योगपर्व-अ० ७ गी० ७५-७८]. तसेंच 'क्षीर न खाय खळाची प्रभु विदुराच्याच जेवितोचि कण्या । आवडतिच्या सुपाया रोठ्या भरड्या नव्या जुन्या चिकण्या' ॥ ही आर्या तर सुप्रसिद्धच आहे. ३. आस्वादणे खाणे, भक्षणे, रुचि घेणे. ४. ही गोष्ट जर खरी असेल तर. ५. तसल्या कण्या विदुराने कशा दिल्या. ६. आपला स्व म्हणजे आत्मा असा जो तूं प्रभु त्या तुला नुसत्या तांदुळांच्या कण्या विदुराने कशा दिल्या? विदुराने तुम्हांस कण्या खाऊ घातल्या आणि तुम्हीही त्यां प्रेमाने भक्षिल्या हे मोठे आश्चर्य होय. प्रेमभावाने कोणीं कांही नला दिले तर ते भक्तार्पित म्हणून चांगले मानून त्याचा स्वीकार करतोस अशी उदाहरणे आहेत, तर माझ्या कवितावधूचा तूं स्वीकार करावा असा भाव. ७. स्व-आत्मा, धन. आपुलें निजधन जो तूं त्या तुला. [स्व=ज्ञाति, आत्मा, धन, 'स्वो शात्यात्मनोः स्वं निजे धने' इति हेमचंद्रः. असे स्व शब्दाचे अर्थ आहेत.] या केकेंत 'सभाग्य' सुनय' आणि 'आप्त' ही पदें साभिप्राय विशेषणे आहेत म्हणून हा परिकर अलंकार जाणावा.