________________
जिणें रैस पहावया |शिथिली रदीं चाविली, 39 सुवासहि कळावया प्रथम नासिकी लाविली;। तुम्हासि शबरी तशी बदरिकाफळे दे, जुनी १. जिणे रस पहावया प्रशिथिली रदीं चाविली, [आणि सुवासही कळावया प्रथम नासिकी लाविली, तशी बदरिकाफळे तुम्हासि शबरी दे अशि जुनी कथा असो, तुम्ही स्वचरितें मेजुनी पहा-असा अन्वय. भक्तार्पित पदार्थ कसाही असला तरी तो भगवंताला फार आवडतो अशा अभिप्रायाने आणखी शबरीचे उदाहरण देऊन स्वप्रार्थनेचे समर्थन करीत होत्साते कवि म्हणतात. जिणे ज्या शबरीने, भिल्लिणीने, अर्थसंदर्भानें श्रमणा नामक शबरजातीय स्त्रीने. २)[बोरांचा रस (गोडी) पहाण्याकरितां, बोरांचा रस आंबट, गोड, तुरट पहाण्यासाठी. शिथिल झालेल्या रदी (दांतांनीं) फार सईल दांतांनी (चाविली). प्रभु राम भुकेला असेल, त्याला चांगली चांगली रसाळ बोरे वेंचून अर्पण करावी असा हेतु मनांत धरून बोरें तोडली आणि त्यांची गोडी पाहण्यासाठी म्हातारपणामुळे फार शिथिल झालेल्या दांतांनी चाविली आणि नंतर रामाला दिली. ४. त्या बोरांचा सुवास कळण्याकरितां पहिल्याने ती आपल्या नाकाला लावून हुंगिली. ५. या बाईचें नांव श्रमणा. ही शबर (भिल्ल) जातीची होती म्हणून शबरी हे जातिवाचक नाम (सामान्यनाम) हल्ली विशेषनाम झाले आहे. आलीकडे नामदेव (शिंपी), चोखामेळा (महार) इत्यादि विशेषनामें जातिवाचक म्हणजे सामान्यनामें झाली आहेत. त्याचे उलट शबरीचे उदाहरण आहे, त्याचा उपयोग विशेषनामाप्रमाणे केला आहे. कथासंदर्भ:-श्रीरामचंद्र सीतेच्या शोधार्थ दंडकारण्यांत फिरत असतां त्यांना एक शवर जातीची मातंगऋषीची शिष्या भेटली. तिनें रामास सीतेचा शोध सांगितला व मोठ्या प्रेमाने रामास प्रथम आपण चोखून रसाळ म्हणून निवडून ठेविलेली वोरे खावयास दिली व प्रभु रामचंद्रांनी शबरीच्या भक्तीस्तव ती मोठ्या आवडीने खाल्ली. शबरीने उष्टी बोरें रामास दिली ही कथा वाल्मीकि रामायणांत नसून अध्यात्मरामायण अरण्यकांड सर्ग १० श्लो० ४-१० यांत व पद्मपुराणांत दिली आहे. मोरोपंत व इतर कवि ह्यांनी ह्या शव. रीच्या कथेचा पुष्कळ ठिकाणी उल्लेख केला आहे. प्रभूच्या ह्या शबरीवरील कृपेविषयों पर वचनें पहा:-(१) नामनिरत शबरीची त्वां उच्छिष्टेंहि भक्षिली बदरें ॥ [मोरोपंत विठलप्रनिधि _गी. ९ पृ० १३७.] (२) ऐका महिमा आवडिची । वोरें खाय भिलटीची ॥ १ ॥ थोर प्रेमाचा भुकेला । हाचि दुष्काळ तयाला ॥ २ ॥ पोहे सुदामदेवाचे । फके मारी कोरडेच ॥३॥ . तुकाराम-अभंग १५७]. (३) 'ज्याच्या चरणरजांहीं श्रीदेवी भूषवी सदा कबरी। शबरी ती वहुमानी, वा गति दे तीस जानकीश बरी' (हरिवंश) अ० ९ (४) 'अमृतममृतफलमदरं बदरं प्रेम्णा बभक्ष चित्रमिदं । तदपि च शबरीदत्तं मत्तं मध्वं न मामियं मुनिवाक्' ६९ (मोरोपंत-मुक्तामाला 'फलानि च सुपक्कानि मूलानि मधुराणि च । स्वयमास्वाद्य माधुर्य परीक्ष्य परिभक्ष्य च । पा. निवेदयामास राघवाभ्यां दृढव्रता ॥' इति पाझे. [स० ७४ श्लो० १७ टीका पहा. पृ०५८३. १० मो० के०