Jump to content

पान:केकावलि.djvu/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत रवीचा सखा रविसख, त्याने. 'राजाहःसखिभ्यष्टच' (पाणिनि-५-४-९१, कौमुदी ७८८) या सूत्राने 'रविसख' हा षष्ठीतत्पुरुष होय. हे सूत्र मानण्याचे कारण नसते तर रवि आहे सखा ज्याचा असा विग्रह करून हे बहुव्रीहिसमासाचे उदाहरण मानणे अधिक प्रशस्त आणि स्वाभाविक झाले असते. रघुवंशांत महिषीसख (सर्ग १ श्लो० ४८) सचिवसख (सर्ग ४ श्लो० ८७) अशी उदाहरणे आहेत ती वरील सूत्रानुरोधानें षष्ठीतत्पुरुषसमासाचीच आहेत. राजन् अन् आणि सखिन् या शब्दाला तत्पुरुषसमासांती राज, अह आणि सख असे आदेश होतात-असा या सूत्राचा अर्थ आहे; जसें परमराज, उत्तमाह, कृष्णसख. 'सखा मित्रे सहाये ना, वयस्यायां सखी मता' इति मेदिनी. ८. जशी रविसखें (सत्राजिताने) तुम्हा (प्रभूला) नमुनि (कृतापराधाची क्षमा मागून) सात्राजिती (सत्यभामा) दिली (अर्पण केली) [तशी] [मी] आजि ती स्वकृति (माझा ग्रंथ) नमस्कृतिपुरःसर (नमस्कार करून) अर्पितों (अर्पण करितों) असा अन्वयार्थ. सत्राजित तुमचा अपराधी असून त्याने जशी आपली कन्या सत्यभामा तुम्हांस नमस्कारपूर्वक अर्पिली, तसा मी अपराधी असून माझी कवितासुता तुम्हांस देतों, सत्यभामेप्रमाणे हिचाही आपण स्वीकार करा. ९. सत्राजिताची कन्या सत्यभामा. कथासंदर्भ:-केका ८, पृष्ठ २९, 'रावसखोत्थिता' वरील म्हणजे तिसरी टीप पहा. ह्या कथेकडे ह्या व पुढील केकेंत कविकटाक्ष आहे. सत्राजिताच्या कृतापराधाची क्षमा करून जर देवा! आपण त्याच्या कन्येचें पाणिग्रहण केले, तर मग मजवरच कां आपण क्रोध कराल? तेव्हां माझ्या अपराधांकडे दुर्लक्ष्य करून माझ्या कविताकन्येचा आपण स्वीकार करा-असा कवीचा हृद्गतार्थ. कवि जर कृतमंतु (कृतापराध) आहे तर तो दुष्कृति आहे हे सिद्ध आहे. या सिद्ध गोष्टीचेंच विधान 'मी दुष्कृती खराच; याप्रमाणे केलें आहे म्हणून हा विधि नामक अलंकार होय. जेथें सिद्ध अशा गोष्टीचेंच विधान केलेले असते तेथें विधि नामक अलंकार होतो, याचे लक्षण:-(१) सिद्ध'स्यैव यदार्थस्य विधानं चेत्तदा विधिः । सभायां शास्त्रगोष्ठीपु विद्वान्विद्वान् भवेत्सखे ॥.' [मंदारमरंदचंपू-१० व्यंग्यबिंदु-पृ० १४९.] सिद्धपदार्थविधाना विधि म्हणती विबुध सत्य अवलोकी । पंचमसमुदयसमयीं कोकिल तो कोकिल प्रगट लोकीं ॥ निश्चयाने जाणलेल्या प्रसिद्ध पदार्थाचे विधान करणे हे उपयुक्त नसल्यामुळे बाधित होत्सातें अथातर संग्रहाने अत्यंत सुंदर भासते म्हणून त्यास विधि अलंकार म्हणतात. वरील उदाहरणात काकिलाच ठाया कोकिलत्वाचे विधान हे अनुपयुक्त असतां 'अत्यंत मधुर अशा पंचमस्वराच्या उदयाने तो सकल जनांस मनोहर भासतो' या अर्थाचा संग्रह करित आहे आणि हा अर्थ पचर मसमुदयसमयीं' या पदाने रपष्ट केला आहे. याची अन्य उदाहरणे:-(१) अहो में घोडे ते घोड आणि गाढव तें गाढव. त्यांची बरोबरी कशी होईल ? (२) पहा ! कसे झाले तरी रल ते रत्न आणि कांच ती कांच हे काय सांगावें ? (३) कर्ण म्हणतो-'रिपुनृपसर्पसुपर्णा कर्णासहि एक जाणतों मीच (कर्ण २७-१७). येथे उपमेय-कवि आणि स्तुति, उपमान-रविसख आणि सात्राजिती, श्यवाचकपद जशी, आणि नमस्कृतिपुरःसर देणे हा धर्म, याप्रमाणे पूर्णोपमा झाला आहे. 'निवाराया पापा हृतविनततापा यदुहिता । समपी पद्मापा मग धुउनिया री केला यत्न प्रभुवर न रत्नग्रह करी, । वरी प्रेमें कन्या हृदयिं न तदन्यायहि पाय दुहिता ॥ जरी केला यत्न प्रभुवर न रत्नग्रह करी, ।