पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे असे सिद्ध करण्यास एकही प्रमाण सांपडत नाही. ह्मणून पृथ्वी आपले आंसासभोंवतीं भ्रमत आहे असेच झटले पाहिजे. येथपर्यंत पृथ्वी आपले आंसासभोवती फिरते किंवा काय याचा विचार झाला. आतां पृथ्वी सूर्यासभोवती फिरते किंवा सूर्य पृथ्वीसभोवती फिरतो याचा विचार करूं. ११. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी--सर्व ब्रह्माण्डांत--आकर्षणाचे बंधारण आहेसे दिसते. चंद्रसूर्यांचे आकर्षणाने समुद्रातील पाण्यास भरती व ओहोट येतात. पृथ्वीच्या आकर्षणाने पृथ्वीवरील सर्व पदार्थ पृथ्वीकडे ओढले जातात. ग्रहांना कक्षांमध्ये ओढणारा जर कोणी नसता तर ते सर्व आपआपल्या जडत्वाच्या धर्मामुळे समोर अंतरा- ळांत गेले असते, परंतु कक्षामध्याकडे (केंद्राकडे) त्यांस ओढणारा कोणी तरी आहे यामुळे त्यांस वळवून त्यांच्या कक्षांत तो आपल्या सभोवती त्यांस फिरण्यास लावितो. अशा प्रकारे चंद्र पृथ्वीसभोंवतीं फिरत आहे. मंगळ, गुरु, शनि इत्यादिकांचे उपग्रह त्यांचे भोवती फिरत आहेत. ग्रह सूर्यासभोवती फिरत आहेत. एकमेकांचे आक- पणाने ग्रहगतीत जे फेरफार होतात ते सर्व वेधकर्त्यांचे अनुभवास येतात. १२. पदार्थांच्या कणांत में आकर्षण आहे त्यामुळे ते घट्ट अवस्थेत आहेत. त्यांस उष्ण केलें ह्मणजे स्नेहाकर्षण कमी होऊन ते पातळ होतात. ते फार उष्ण झाले झणजे स्नेहाकर्षणाचा नाश होऊन ते वायुरूपी होतात. पदार्थ घट्ट असो किंवा पातळ असो किंवा वायुरू- पांत असो, या तीही अवस्थांत पृथ्वी त्यास आपल्याकडे ओढीतच असते. डोंगराशेजारी ओळंबा टांगेला तर त्यास डोंगर आपल्याकडे ओढून घेतो. पाण्यात पदार्थ तरंगत असले तर परस्परांचे आकर्ष- णाने ते एकमेकांकडे ओढले जाऊन एकत्र जमतात. इत्यादि अनेक गोष्टींवरून आकर्षण हे सर्व जगतांत जागृत आहे असे दिसते. १३. कित्येक प्रयोगांवरून विद्वानांनी व त्यांतही न्यूतनाने आकर्ष- णाचे संबंधाने मुख्य दोन नियम शोधून काढिले आहेत ते येणेप्रमाणे:-