पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

< " " अंतरें येतात ती:-बुधाचे ३९, शुक्राचे ७२, मंगलाचे १५२, गुरूचें ५२०, आणि शनीचे ९५४. १५. सूर्य जर चंद्रासारखा पृथ्वीसभोवताली फिरत असता तर त्यावर केप्लरचा तिसरा सिद्धांत लागू झाला पाहिजे. चंद्राच्या एका प्रदक्षिणेचा काल २७ दि० सूर्याच्या " ३६५४ दि. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर २,४०,००० मैल आहे. आणि सूर्या- चें अंतर ९,२०,००,००० मैल आहे. ह्मणजे चंद्राच्या अंतरापेक्षा सूर्याचे अंतर ३६८ पट मोठे आहे. त्याचप्रमाणे वर दिलेल्या कालावरून, चंद्राच्या एका प्रदक्षिणेच्या कालापेक्षां सूर्याच्या एका प्रदक्षिणेचा काल १३६ पट मोठा आहे. ह्मणून .:. (१) : (१३६) : : (१): (३६८) ह्मणजे ( १३६) = (३६८) अथवा १८२४= ४,९८,३६,०३२ असे येते. हे प्रमाण सर्वथैव खोटें आहे. सबब सूर्य, चंद्रासारखा पृथ्वी- सभोवती फिरत नाही हे सिद्ध आहे." सूर्यमाला पृ. ३३, ३४. १६. आतां पृथ्वी जर सूर्यासभोवती फिरत आहे तर तो तिसरा सिद्धांत पृथ्वीवर लागू झाला पाहिजे. आपण याचा पडताळा पाहूं. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत जें अंतर त्यास 'एकअंतर' असे मानून त्या मापाने दुसरे ग्रहांची अंतरें घेतली; त्याचप्रमाणे पृथ्वीचा प्रद- क्षिणाकाल झणजे ३६५.२५ दिवस इतकें 'एककाल' मान असें धरून दुसरे ग्रहांच्या प्रदक्षिणाकालांची माने काढली तर परस्परां- मधील प्रमाण पाहण्यास बरें पडते. यासाठी खाली दिलेल्या कोष्ट- कांत त्याप्रमाणे माने घेऊन केप्लरचे तिसरे सिद्धांताची सर्व ग्रहांवर योजना केली आहे.