पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या उष्णतेमुळे हलका झालेला असतो. कोणत्याही भट्टीत तापलेली हवा वर जाऊन त्या ठिकाणी थंड हवा यावयाची हा वातावरणाचा धर्म आहे. त्याप्रमाणे विषुववृत्ताकडील तापलेली हवा वर जाऊन त्या ठि- काणी ध्रुवाजवळची थंड हवा आलीच पाहिजे. पृथ्वी जर आपले आंसासभोवती फिरत नसती तर उत्तरेकडील वारे उत्तरेकडून व दक्षिणेकडील वारे दक्षिणेकडून असे आले असते. परंतु पृथ्वी आप- त्या आंसाभोवती फिरत असल्यामुळे, उत्तर प्रदेशांतील अल्पगति वायु दीर्घ गतीच्या प्रदेशांत आल्यामुळे ते मागे राहतात, आणि उत्तरे- कडून समोर येण्याबद्दल ते ईशान्य दिशेने येऊ लागतात. अशा ई- शान्य व आग्नेयी दिशांच्या सतत वाहणारे वायूंवरून पृथ्वी फिरत आहे, स्थिर नाही, असेंच सिद्ध होते. १०. विषुव वृत्ताकडे फुगलेला आणि ध्रुवाकडे चापट असा भूगोलाचा आकार आहे. परमेश्वराने पूर्वीपासून तिला असाच आकार दिला आहे, असे समजले जाई. वास्तविक परमेश्वराने पहिल्याने तिला कोणता आकार दिला हे आपल्यास काहीच ठाऊक नाही. परंतु सर्व द्रव्यां- मध्ये जी आकर्षणशक्ति परमेश्वराने ठेविली आहे, तिच्या नियमा- प्रमाणे पाहिले तर पृथ्वी स्थिर असती तर ती गोलाकार असली पाहिजे होती, आणि गतिमान असली तर तिने विषुववृत्ताकडे ध्रुवो- त्सारक प्रेरणेचे योगाने फुगले पाहिजे होते, असे पदार्थविज्ञान शा- स्त्रावरून समजते. विषुववृत्ताकडे पृथ्वी फुगीर आहे हे खचीत आहे, तर ती आसांसभोवती फिरल असली पाहिजे हे उघड आहे. रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र व शनि आदिकरून आकाशांतील सर्व ग्रह आपआपले आंसासभोवती फिरणारे आहेत असे आढळते. पृथ्वी ही एक त्यांतीलच खस्थ पदार्थ आहे, तिने तरी आपले आंसासभोवती कां फिरूं नये? अशा रीतीने कितीएक प्रमाणांनी पृथ्वी आपले आंसासभोवती फिरत आहे असे सिद्ध होते. दुसन्या प्रमाणांवरून असेंच जरी सिद्ध होत नाही, तरी अशा रीतीने फिरा- यास तिला काही हरकत नाही असे स्पष्ट होते. परंतु ती स्थिर