पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असे कोणीही ह्मणेल. तसेंच एक पृथ्वी फिरवावयास सोपें किंवा ग्रह, तारे व सर्व अनंतब्रह्मांड फिरवावयास सोपें असा कोणी प्रश्न केला तर एक पृथ्वी फिरविण्यास सोपें असें कोणीही सांगेल. यांत पृथ्वी फिरतेच आहे असे जरी ह्मणतां येत नाही तरी त्यांत सौकर्य आहे असें कबूल केले पाहिजे. ७. उंच गच्चीवरून धोंडा खाली फेंकला तर तो त्याच्या ओळंब्या- खालच्या स्थानापुढे काही अंतरावर पूर्वेस जाऊन पडतो. ही गोष्ट नेहमी पडताळून पाहतां येणारी आहे. भिंतच तिरकी असेल किंवा लंबरेषा पहातांच येणार नाही, अशा प्रकारच्या शंका काढणारांस मूर्खच झटले पाहिजे. धोंडा नेहमीं पूर्वेस पडतो असे जर नेहमी अ- नुभवास येत आहे तर पृथ्वी आंसासभोवती फिरत आहे असेंच ह्मणावे लागते. त्या शिवाय धोंड्याच्या पूर्वगतीची उपपत्ति करि- तांच येत नाही. ८. फोकाल्टच्या आंदोलकाचा अनुभव उगेंच काही तरी बोलून उडवून देता येत नाही. उंचीवरून एक तार टांगून तिच्या शेवटास आंदोलक अडकविला आणि त्यास उत्तरदक्षिण, किंवा पूर्वपश्चिम, किंवा दुसऱ्या कोणतेही दिशेनें हेलकावे खाण्यास लाविलें, तर हळू हळू ती हेलकाव्यांची दिशा बदलत जाते. हा फेरबदल एका तासांत ( १५ अंश भुजज्या अक्षांश ) इतक्या बेतानें नेहमी झालेला अनुभवास येतो. पृथ्वी जर स्थिर असती तर हा फेरबदल झणजे दिशाभेद कधीही झाला नसता. दिशाभेद होतो असे जर नेहमीं अनु- भवास येत आहे तर पृथ्वी आपले ऑसासभोवती फिरते आहे असेंच झटले पाहिजे. ९. सतत एक दिशेनं वाहणारे वायु, झणजे " ट्रेड विडस् ।' विषुववृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशांत वारा सतत ईशान्येकडून वहात असतो; आणि दक्षिणेकडील प्रदेशांत आग्नेयीकडून वाहत असतो. या वाऱ्याचा अनुभव नौकागमन करणाऱ्यांस नेहमींचा असतो. सूर्यकिरणांच्या उष्णतेमुळे विषुववृत्ताकडील प्रदेश तापून तेथील वायु