पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्रीः॥ कुभ्रमनिर्णय, भाग १ ला सामान्य विचार. पृथ्वी स्थिर आहे किंवा गतिमान् आहे ? याविषयी विचार. १. परमेश्वर सर्वशक्त आहे. भूमीला स्थिर राखून आकाश व तद्गतपदार्थ फिरविणे, किंवा आकाश व तद्गतपदार्थ स्थिर रा- खून भूमीला फिरविणे या दोन्ही गोष्टीपैकी कोणचीही त्यास करण्यास शक्य आहे; परंतु आपल्यास पाहणे हे आहे की, या दोहोंपैकी त्याणे वास्तविक केले आहे कोणतें ? २. कोणतीही गोष्ट परमेश्वराने केलेली असो, किंवा आपोआप झालेली असो, तिच्या सत्यत्वाचा पडताळा पाहण्यास कोणतीही हर- कत नाही असे मला वाटते. ३. दुसऱ्याने सांगितलेली गोष्ट नुसती खरी मानणे, आणि ती पडताळून पाहिलेल्या गोष्टीचा खरेपणा, नुसत्या खरे मानण्यापेक्षा ज्यास्ती आहे असे कोणीही कबूल करील.