पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वती फिरतात. पृथ्वीही आपला चंद्र सभोंवतीं घेऊन सूर्यासभोवती फिरते. वें साम्य-शुक्र, मंगल इत्यादि ग्रहांच्या धृवांशी थंडीने गोठलेल्या पाण्याचे झणजे बर्फाचे प्रदेश दृष्टीस पडतात. पृथ्वीवर ध्रुवांजवळचे प्रदेशांत पुष्कळ गोठलेलें बर्फ आहे. सूर्याचे पृष्ठ सर्व ठिकाणी अति- उष्ण व देदीप्यमान असे आहे. २१. सूक्ष्मवेधांवरून अलीकडे असेंही ध्यानात येऊ लागले आहे की, ज्याप्रमाणे इतर ग्रह आपआपले चंद्र संगती घेऊन मुर्या- सभोवती फिरतात त्याचप्रमाणे सूर्य आपले सर्वग्रह आपल्या बरोबर घेऊन एका मध्याभोवती फिरत आहे. कोणत्या मध्याभोवती याचा अनून थांग लागला नाही, परंतु हल्ली त्याचे चालण्याचा रोख आका- शांत शौरी ( इंग्रजी, हक्युलिस ) या नांवाच्या तारकापुंजाकडे आहे. श्रीमन्नानाकृते कुभ्रमनिर्णये सामान्यविचारः समाप्तः