पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ची पातळी सोडून जसजसे वर किंवा खाली जावें त्या त्या प्रमाणे त्यांच्या त्यांच्या दीर्घ वर्तुळांचे लक्ष अधिक होत जातात; आणि शेवटी कदंबा जवळ जे तारे आहेत ते २० कला त्रिज्येची किंवा चाळीस विकला व्यासाची क्रमितांना दृष्टीस पडतात. हजारों तारागणांचा ' स्थानभेद ' दृष्टीस पडतो त्यास इंग्रजी ज्योतिःशास्त्रांत 'ऑबरेशन ' असें ह्मणतात. आपण जर स्थिर उभे असलो आणि वरून आपल्यावर पाऊस पडत आहे तर तो लंबरूपाने आपल्या डोकीवर येत आहे असे दिसते. परंतु तेच आपण जर चालू लागलों तर तोच पाऊस आप- ल्यावर तिर्कस रेषेने येत आहे, असे आपल्यांस दिसते. जो दिशाभेद ते पावसाचे ' ऑबरेशन.' १८. प्रकाशकिरणाला गति आहे. तो एका सेकंदांत १,८६,००० मैल चालतो. सूर्यापासून त्यास पृथ्वीपर्यंत येण्यास ८ मिनिटे लागता- त. पृथ्वी जर स्थिर असती तर ताऱ्यांचे किरण ज्या ज्या दिशांनी पृथ्वीवर येऊन पोंचते त्या त्या दिशांनीच ते पृथ्वीवरील पाहणारांस दिसते. परंतु पृथ्वी गतिमान् असल्यामुळे, पावसाप्रमाणे, पाहणारांस ते भलतेच दिशेस दिसतात, आणि ताऱ्याचे " ऑबरेशन " दृष्टिगो- चर होते. याप्रमाणे एक नाहीं, दोन नाही, परंतु आकाशांतील हजारों तारे पृथ्वी स्थानभ्रष्ट होत आहे अशी साक्ष देतात. सूर्यापासून जी ग्रहांची फापुढे एक अंतरे त्यांत एका प्रकारचा चमत्कारिक नियम सांपडतो. तो असा की, ग्रहाच्या अंतराच्या दुपटीत ४ वजा केले तर पुढच्या ग्रहाचे अंतर सरासरीने येते. पुढील कोष्टकांत पृथ्वीपासून सूर्यापर्यंत में अंतर त्यास १० असे मानिलें आहे, आणि त्या मानाने इतर ग्रहांची अंतरे दिली आहेत ती पहा. १९. या अंतरांच्या मालिकेत पृथ्वी सांपडते, तेव्हा इतर ग्रहांप्रमाणे