पान:काश्मीर वर्णन.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ९४ )

दिल्लीप्रमाणें तयार होते म्हणून समजलें, पण तें आह्मांस पहावयास मिळाले नाहीं. देवदारू किंवा दुसरे नरम लाकूड घेऊन त्याजवर कोरीव व जाळीदार काम येथें फार सुरेख तयार होतें. या कामास दर चौरस यार्डास एक रुपया पडतो. हें काम श्रीनगर येथील श्रीमंत लोकांच्या घरांत पुष्कळ दृष्टीस पडतें. येथील कारागीर इतके हुशार आहेत की, त्यांस हस्तकौशल्याने केलेला कोणताही पदार्थ दाखविला असतां ते त्या बरहुकूम करून देतात.

प्रसिद्ध बगीचे.

या देशांतील हवापाणी व जमीन हीं उद्भिज कोटीस चांगली अनकूल असल्यामुळे श्रीनगरचे आसपास सरकारी व खासगी अनेक बगीचे तयार केले आहेत. त्यांत दल सरोवराच्या कांठचे बगीचे मोठे रमणीय असून त्यांची रचनाही फार मजेदार आहे, करितां त्यांतील कांहींचें वर्णन देतों. शालीमार (मदनगृह) नांवाची प्रसिद्ध बांग सरोवराच्या ईशान्येस आहे. ही जहांगीर बादशाहानें त्याची प्रिया जी नूरजहान हिच्यासाठी तयार केली होती. ही बाग आणि सरोवर यांच्यामध्यें एक कालवा आहे. याच्या दोहोंबाजूंवर चिनार, वाकुंज व दुसऱ्या वृक्षांची दाट झाडी लागून गेली आहे. या बगीच्याची लांबी अजमा ६० ०० व रुंदी २५० यार्ड होईल. याच्या भोंवतीं पक्कचा विटांचा एक तट बांधिला आहे. या स्थळाचें सौंदर्य पाहून मनास फारच आनंद होतो. त्यांत एकावर एक चढते व एका रेषेंत पण पृथक् असे चार बंगले आहेत. प्रत्येकाच्या पुढच्या बाजूस एकेक चौकोनी