पान:काश्मीर वर्णन.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Islas achter?

( ९३ )

पदार्थ पाहिले, ते आम्हांस फार सुरेख वाटले. याच मासल्याचें काम मऊ लांकडाचे तक्ते घेऊन त्यांजवर करितात आणि ते तक्ते दिवाणखान्याच्या छतास व भिंतीस जोडितात. येथें बंदुका व पिस्तुलें जीं तयार । होतात, त्यांतील नळ्यांचें काम मोठी तारीफ करण्यासारखें असतें. येथील चर्मकार कातडी कमावण्याच्या कामी मोठे कुशल असून त्यांस जिनें, त्रंक्स (पेट्या), डोल, बूट, चढाव इत्यादि हरएक सामान चांगलें करितां येतें.. आपल्या देशीं पूर्वकालीं दौलताबादी कागदाची मोठी प्रसिद्धि होती. त्या नमुन्याचे चांगले मोहरेदार कागद येथें तयार होतात. ते तागाचे करितात. श्रीनगराजवळ | नऊशिरा नांवाचें एक स्थळ आहे, तेथें कागद तयार करण्याचा एक मोठा सरकारी कारखाना आहे. पंजाब प्रांतांतील सर्व व्यापारी लोक मुख्यत्वें याच कागदांचा उपयोग करितात. भांड्यांवर मिन्याचें सुरेख काम करून त्यांजवर सोन्याचा मुलमा देतात. हीं भांडीं वजनावर विकतात. नकशीचें कामही येथें सुरेख तयार होतें. चांदीच्या भांड्यावर नकशी खोदून तिजवर सोन्याचा मुलामा चढवितात. तसेंच नकशीचें काम तांब्याच्या भांड्यावर रुपें चढवून करितात. नकशीदार तबकें, सुरया, पेले, वाट्या, फुलपात्रें, चहादाण्या, शेंदुराच्या कळ्या इत्यादि पदार्थ महाराजगंज येथील दुकानांत विकरीस ठेविलेले असतात. ही नकशी शालीवर जें वेलबुटीचें काम करि- तात त्याच धरतीवर असते. नकशीदार चांदीची भांडीं दर तोळ्यास सव्वा रुपाया आणि तांब्याची दर तोळ्यास तीन आणे प्रमाणे विकतात. जडावाचें कामही येथें।