पान:काश्मीर वर्णन.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ९२ )

उत्पन्न होणारें रेशीम तयार करण्याचे कारखाने येथें पूर्वी पुष्कळ असून मध्यंतरी ते बंद पडले होते. पण सांत्र- तच्या महाराजांचे वडील यांनी या कारखान्यांकडे चांगलें लक्ष्य देऊन इ० स० १८७१ सालीं या कामी तीन लक्ष रुपये खर्च केले. पुढच्या साली ७२० मण (१२०,००० रुपये किंमतीचें ) रेशीम उत्पन्न झालें. सांप्रत काळी या कारखान्याची स्थिति कशी आहे तिचा आम्ही तपास केला पण बरोबर माहिती मिळाली नाही. याशिवाय दुसरे धंदे पेपिअरम्याचीचें काम, सोनार, मिनेगार, मुलामा देणारे यांची कामें, बंदुका तयार करणें, कातडी कमा- वून त्यांचें सामान करणें, कागद तयार करणें, चितारी, कातारी व सुतार इत्यादि कारागिरांचे धंदे चालू आहेत. यांतील प्रत्येकाविषयीं थोडी थोडी माहिती खालीं देतों. कागद कुटून त्यांचा लोण्यासारखा मऊ रद्दा करितात आणि त्यांत कांहीं चिकण पदार्थ घालून त्याचा रांधा | बनवितात. नंतर त्याची लहान टेबलें, पेट्या, कलमदानें, तबकड्या, डबे व दुसरे इष्ट पदार्थ तयार करून त्यांजवर | सुरेख वेलबुटीचें किंवा दुसरें नकशीदार काम करितात आणि त्या पदार्थांस निरनिराळे रंग देऊन त्यांजवर रोगण फिरवितात. वर सांगितलेल्या रद्याचे लहान मोठे फळे तयार करून त्यांजवरही वेलबुटीचें किंवा | नकशीचें काम करितात आणि हे फळे श्रीमंत लोकांच्या |घरांच्या भिंतीस व छतास लावितात. पेपिअरम्याची हा फ्रेंच शब्द असून हे काम प्रथम फ्रान्स देशांत करूं लागले. हें काम पुष्कळ वर्षेपर्यंत टिकतें. महाराजगंजा- नजीक एका दुकानों जाऊन पेपिअरम्याचीचे कांहीं