पान:काश्मीर वर्णन.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ९१ )

मात्र ते श्रीनगर येथें किंवा त्याच्या आसपास रम्य व हवाशीर स्थळीं राहवयास जातात. जम्मू येथें पाहण्या- सारखी स्थळें सरकारी किल्ला, राजवाडा, कचेन्या, क्रीडा- स्थानें, बगीचे व दुसरे कारखाने हीं होत. महाराजांची टंकसाळही येथेंच आहे पण सांप्रत ती बंद असल्याचें समजतें. तोफखाना, घोडेस्वारांची व पायदळ पलटणें इत्यादि सैन्य येथें बरेंच राहतें. महाराजांचे येथें बरेच दिवस राहणें होत असल्यामुळे श्रीनगराप्रमाणें येथेंही सर्व कारखाने ठेविले आहेत. त्यांत संस्कृत व वेदशाला, इंग्रजीशाला, दवाखाना हीं मुख्य होत. पूर्वकालीं हें गांव आतां पेक्षां अधिक भरभराटींत होतें, असें याच्या आसपासच्या खुणांवरून दिसतें. याच्या मागल्या बाजूस त्रिकुटी नांवाची एक टेकडी आहे. तेथें एक देवस्थान असून श्रावण महिन्यांत एक मोठी जत्रा भरते. तेव्हां हजारो लोक देवदर्शनास जातात.

श्रीनगर येथील घंवे.

असल्यामुळे त्यांत या देशांत अनेक जातींचे कारागीर निरनिराळ्या प्रकारचे धंदे येथें चालू आहेत. श्रीनगर येथें आज मितीस जे धंदे सुरू आहेत, त्यांज- विषयीं कांहीं वर्णन देतों. येथील सर्व धंद्यांत मुख्य धंदा म्हटला ह्मणजे शाली विणण्याचा होय. त्या- संबंधाची माहिती पूर्वीच दिली आहे. येथें रेशमी कपडेही बरेच तयार होतात. रेशीम उत्पन्न करणारे किडे तुतीच्या पानांवर जगतात. ते वृक्ष या देशांत विपुल असल्याचें पूर्वी सांगितले आहे. या कृमींपासून