पान:काश्मीर वर्णन.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(९० )

पाहाण्यास मिळाल्या नाहीत म्हणून आमचे मनास ती गोष्ट लागली. पण उपयोग काय? असो. या वेळी दोन घटका दिवस राहिला होता आणि आम्हांबरोबर दिलेल्या शिपायानें अल्लीमशीद पाहाण्यास जाण्याची शिफारस केली, तेव्हां बरें म्हणून तिकडे निघालों. ही मशीद सफाकदल नांवाच्या सातव्या पुलाच्या पलीकडे पण आमच्या चिन्हाडापासून बरीच दूर आहे. तिचें काम लांकडी असून भोंवतीं मोठमोठे चिनार वृक्ष आहेत. यांत एक वृक्ष एवढा मोठा होता कीं, तो चारपांच वावांत मावत नसे असें बरोबरच्या शिपाई बावांनी सांगि तलें. वरील मशीद सुलतान हसन बादशाहानें इ० स० १४७० त बांधल्याचा लेख आहे.

जम्मू.

या देशांतील मुख्य व प्राचीन राजधानी ( श्रीनगर) व त्यांतील दुसरी रम्य स्थळे यांची प्रियवाचकांस बरीच ओळख करून दिली. आतां दुसरी राजधानी जी जम्मू तिजविषयीं दोन शब्द लिहितों. वायव्य लोहमार्गावर वजिराबाद नांवाचें एक स्टेशन असून त्याचा फांटा जम्मू येथें जातो. वजिराबादेहून जम्मू हें गांव पन्नास मैलांवर आहे. तें तावी नांवाची चिनाब नदीची एक शाखा आहे, तिच्या उजव्यातीरीं वसलें असून डाव्या तीरीं लोहमार्गाचें स्टेशन आहे. येथील लोकसंख्या ४२,००० असून त्यांत हिंदूंचा भरणा अधिक आहे. प्रतापसिंग यांच्या पूर्वजांचें हें शहर मुख्य असल्यामुळे ते बहुतकरून येथें राहतात. उन्हाळ्यांत सांप्रतचे महाराज ठिकाण