पान:काश्मीर वर्णन.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बसले. या पंडितांतील एक असामी बरीच वर्षे पंजा: बांत राहिला असल्यामुळे त्यास आपल्या देशांतील धर्म, रीतिरिवाज इत्यादि गोष्टींची पुष्कळ माहिती असल्याचें त्याच्या भाषणावरून दिसलें. ब्राम्हण धर्मांतील सोळा संस्कार, हिंदूंचे सण, लग्नसंबंधी रीतिभाति इत्यादि अनेक गोष्टींविषयीं आमच्या घेडगुजरी हिंदुस्थानी भाषेमध्ये आम्ही त्यास पुष्कळ प्रश्न विचारून कांहीं माहिती मिळविली, ती " या देशाची सांप्रत स्थिति" या प्रकरणांत दाखल केली आहे. वरील देवालयांत ४,५०० हस्तलिखित संस्कृत ग्रंथ असून त्यांची यादी लाहोर येथील 'ओरिएन्टल' कॉलेजचे प्रिन्सिपाल डॉ० एम्. ए. स्टीन ह्यांनी तयार केली असून ती ' निर्णयसागर' छाप- खान्यांत छापून प्रसिद्ध झाली आहे, असें आह्मांस मागा- हून समजलें. नाही.

या पंडितांचा निरोप घेऊन आम्हीं गदाधर मंदिर

पहावयास गेलों. याची बांधणावळ बहुतेक अंशीं राघवमंदिरा सारखीच आहे. पण हैं तितकें सुरेख येथून संमदशाहाचे दुकानीं त्यानें सांगितल्या- प्रमाणें अति मौल्यावान् शाली पाहण्याच्या हेतूनें पुनः गेलो. तेव्हां आपला मुनीम बाहेर गेला आहे, यामुळे त्या आतां दाखविण्यास सवड नाहीं म्हणून त्यानें सांगितलें, आम्हांपासून त्यास कांही लभ्यांश होण्याचा नसल्यामुळे उंच शाली काढून दाखवीत बसण्याची व्यर्थ मेहनत तो बहुतकरून करणार नाही, असे आम्हांस आदले दिव- शींच वाटलें होतें; त्याप्रमाणें अनुभव आला म्हणून फार निराशा झाली नाहीं. तत्रापि अति मौल्यवान् शाली