पान:काश्मीर वर्णन.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ८८ )

फळा लाविलेला आहे. तो नसता तर येथें पोस्ट आफिस आहे असे कोणाच्याही लक्षांत आलें नसतें.

नित्याप्रमाणें भोजनोत्तर किस्तीत बसून शहर पहा-

वयास निघालों. प्रथम नदीच्या डाव्या तीरीं राघवदास नांवाचें एक देवालय आहे तेथें गेलों. हें मंदिर ह्मणण्या- सारखें मोठें नाहीं पण याचें काम मात्र पाहण्यासारखें सुरेख आहे. मुख्य दरवाज्याच्या आंतल्या बाजूस लहा- नसें एक चौकोनी पटांगण असून मध्यभागी एक चौथरा केलेला आहे, त्याजवर हें मंदिर बांधलेले आहे. त्यांत मुख्य स्थानीं राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ति बस- विल्या असून बाजूस गणपति, सूर्य व देवी यांच्या मूर्ति आहेत. देवदर्शन घेऊन आह्मी बाहेरच्या बाजूस चौथ- ज्यावर कांही पंडित बसले होते, त्यांच्या जवळ येऊन वसलों. यांतील दोन असामी हातांत पोथी घेऊन राम- स्तोत्रांचा पाठ करीत होते. बाकीचे तीन चार असामी कांहीं गप्पा मारीत होते. तुम्ही कोण, कोठून आला व या देशीं येण्याचें कारण काय, असे त्यांतील एका वयस्क पंडितानें आम्हांस हिंदुस्थानींत विचारिलें. भाषेचें ज्ञान आमचें. अगदीं वेताचेंच असल्यामुळे तींत भाषण करण्यास आम्हांस मोठी लाज वाटे. पण निरु- पायास्तव ती बाजूस ठेऊन आमच्या या प्रवासांत "तुम आव, हम जाते," अशा मासल्याचें भाषण करीत असूं, तेव्हां आम्ही मोठें साहस करीत आहों असें वाटत असे. पंडितांनीं विचारल्या प्रश्नांची आम्ही जेव्हां उत्तरें देऊं लागलों तेव्हां आमची अपूर्व भाषणशैली ऐकण्यास स्तोत्र- पाठ करीत असलेले दोघे पंडितही आमच्या मंडळींत येऊन या