पान:काश्मीर वर्णन.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१७)

साधार नाहीं. येथून जुम्मामशीद नांवाची इमारत पहावयास गेलों. ही मशीद शहाजहान बादशाहानें बांध- विली ह्मणून सांगतात. ही इमारत मोठी ढबदार व उंच आहे. तींत तीन दालनें केली असून त्यांतील प्रत्येक खांब ह्मणजे चाळीस हात उंचीचा एकेक देवदारु वृक्षच उभा केला आहे असें ह्मटलें असतां शोभेल. ह्या खांबांवर सुरेख कोरीव काम केले आहे. हें काम पाहून येथें बांधविणाऱ्याच्या इच्छेप्रमाणें इमारत पाहिजे तेवढी उंच व रुंद धरितां येते असे आह्मांस वाटलें. तिच्या स्थिती- वरून तिची कितीएक वर्षे दागदूज झालेली नाहीं असें दिसलें. तिच्या दारावर एक पर्शियन लेख आहे पण त्याचा बोध आह्मांस कसा होणार! येथें एक बुढा फकीर बसला होता, त्यास ही मशीद कोणी व कधीं बांधिली ह्मणून विचारितां, शिकंदर लोदी बादशाहा पांचशे वर्षांपूर्वी होऊन गेला, त्यानें ही बांधिली झणून त्यानें सांगितलें. वर सांगितलेली सर्व स्थलें पाहण्यांत अगदी अस्तमान होऊन गेला. बिहाडी जाऊन कांग्रीचा सत्वर आश्रय करण्यास थंडी सांगू लागली. किस्तीत येऊन बसलों आणि ती परतविण्यास हांजीस सांगितलें. परत येतेवेळी शेरगडी राजवाड्याच्या खालच्या बाजूस पण पलीकडच्या कांठीं शहरांतील पोष्ट आफिस आहे, तेथें जाऊन आमच्या पत्रांचा शोध केला पण एकही पत्र मिळाले नाहीं, तेव्हां आमचे मनास फार वाईट वाटलें. हें पोस्ट आफिस ह्मणजे गोठ्यासारखी दहा बारां खण एक ठेंगणी व गलिच्छ इमारत आहे. तिच्या बाहेरच्या बाजूस 'पोस्ट आफिस' असे शब्द लिहिलेला तेव्हां