पान:काश्मीर वर्णन.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ८६ )

ठेवून बसतात. आठवड्यांतून एक दिवस येथें बाजार भरतो. त्या दिवशीं सर्व व्यापारी लोक आपला माल गि-हाइकांचे दृष्टीस पडण्याकरितां दुकानांत बाहेर काढून ठेवितात. आणि त्या दिवशीं येथें बरीच गर्दी होते. वर सांगितलेल्या कारागीर लोकांचे धंद्यांविषयी आह्मीं वेगळीच माहिती देणार आहों, करितां त्यांजविषयीं येथें विशेष लिहीत नाहीं. सरकारी छापखाना येथून जवळच आहे पण तो पहावयास आह्मीं गेलो नाही.

वरील बाजार पाहून आह्मी शहाहमदन नांवाची

मशीद पहावयास गेलों. ही मशीद वितस्तेच्या उजव्या- तीरी फत्तेकदल पुलाच्या खालच्या बाजूस आहे. हिच्या घुमटावर एक सोनेरी गोळा बसविला आहे. हिच्या आंतल्या बाजूस एक खोदीव लेख आहे. हिच्या खालच्या बाजूस नदीकडे जाण्यास एक लहानसा घाट आहे. या मशिदीच्या समोर नदीच्या पलीकडच्या बाजूस दुसरी एक मशीद दृष्टीस पडते. येथून आह्मीं बादशाहा नांवाची दुसरी मशीद पहावयास गेलों. ही जैनकदल नांवाच्या चौथ्या पुलाजवळ खालच्या बाजूस आहे. श्रीनगर येथें ज्या मशिदी आहेत, त्यांत ही फार जुनी आहे असें ह्मणतात व येथें जैनुल्लुआबदिन बादशाहा याची कबर आहे. हा बादशाहा मोठा प्रतापी पुरुष होऊन गेला व कलाकौशल्यास त्यानें मोठें उत्तेजन दिलें अशी त्याची ख्याति आहे. काश्मीर येथें शाली |विणण्याची कला त्यानें तुर्कस्थानांतून आणिली व वूलर सरोवरांत लंका नांवाचें जें बेट आहे तें यानेंच तयार करविलें असें ह्मणतात, पण यांतील पहिलें ह्मणणे