पान:काश्मीर वर्णन.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ८५ )

विणण्याचे काम पाहून पुनः किस्तीत येऊन बसलों आणि " अंग्रेजी " शाळेकडे ती चालविण्यास हांजीस सांगितलें.

ही शाळा नदीच्या उजव्या तीरी आहे. बाहेरच्या

बाजूने पाहिले असतां येथें इंग्रजी शाळा आहे असे तिच्या इमारतीवरून कोणासही वाटावयाचें नाहीं. एका घराच्या चौकांत ही शाळा स्थापिली आहे. हींत अद- मासें तीनशें विद्यार्थी असून ते इंग्रजी, संस्कृत व पर- शियन या भाषांचा व गणिताचा अभ्यास करितात. या शाळेवरील हेडमास्तर हे यवन असून पंजाब युनि- व्हर्सिटिची प्रवेश परिक्षा पास झालेले आहेत. यांस दरमाहा शंभर रुपये पगार मिळतो. हे गृहस्थ मोठे सुशील दिसले. यांचे हाताखाली एक संस्कृत शिक्षक व सात आठ असामी मदतनीस आहेत. हेडमास्तर व संस्कृत शिक्षक यांजबरोबर आह्मीं बराच वेळ बोलत बसलों आणि त्यांच्या देशासंबंधी गोष्टींबद्दल कांहीं माहिती मिळविली. या शाळेत जे अभ्यास चालतात त्यांचा तपास करितां विद्याखातें या देशांत बाल्याव- स्थेंत आहे असें आह्मांस दिसून आलें. येथें पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी अभ्यास फार तर आपल्या इलाख्यांतील हायस्कूलच्या पांचव्या इयत्ते इतका होईल.) • येथून आह्मी महाराजगंज नांवाचा बाजार पहावयास गेलों. हा बाजार ह्मणजे एक मोठा चौक असून चारही बाजूंच्या सोप्यांत निरनिराळ्या कारागिरांची दुकानें आहेत. चौकांतील पटांगणांत ओबडधोबड फरसबंदी केली असून तिजवर हलके व्यापारी आपला माल विकरीस 8