पान:काश्मीर वर्णन.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ८४ )

दुका- वितात. अहंमदशाहाचें दुकान उजव्या तीरीं प्रथम लागलें. तेथें आलीं न जातां पुढें खालच्या बाजूस डावीकडे संमदशाहाचें दुकान आहे तेथें गेलों. नाचा मालक किंवा मुनीम यानें शिष्टसंप्रदायाप्रमाणे आह्मांस याबसा केलें आणि कोणता माल पाहिजे ह्मणून विचारिलें. तेव्हां शालजोड्या व दुसरा लोंकरी माल पाहण्यास आलो आहों ह्मणून सांगितलें. पुढे वीस पंचवीस रुपये पासून हजार बाराशें रुपये किंमतीच्या शाली व दुसरा माल काढून दाखविला. तो पाहून दोन चार हजारांच्या शाली पाहण्याची आमची इच्छा प्रदर्शित केल्यावरून सुमारे दोन हजारांपर्यंत किंमतीच्या दोन शाली काढून त्यानें दाखविल्या. त्यांहून अधिक मौल्यवान् शाली दाखविण्यास विचारितां एवढी मोठी शाल तुझांस घेण्याची आहे काय? ह्मणून दुकानदारानें विचारिलें. खोटें बोलून कांहीं तरी थापा मारणें ही गोष्ट आह्मांस पसंत नसल्यामुळे मौल्यवान् शाली आह्मी पाहण्यास मात्र आलो आहों, त्या खरेदी करण्याची आह्मांस मुळींच शक्ति नाही व कांहीं खरेदी करण्यास आलों नाही ह्मणून खरा प्रकार होता तो त्यास कळविला. आह्मांपासून कांहीं लभ्यांश होण्याची आशा नाहीं असें समजून उद्यां तिसरे प्रहरी यावें ह्मणजे तशा मौल्यवान् शाली दाखवूं ह्मणून त्यानें सांगितलें. पुढे हातानें व मागावर शाली कशा विणतात हे पाहण्याची इच्छा कळविल्यावरून ते दाखविण्यास आह्मांबरोबर एक • माणूस त्यानें दिला. आह्नीं मुख्य दुकानदाराचा निरोप घेऊन त्या मनुष्याबरोबर गेलो आणि हातानें व मागावर