पान:काश्मीर वर्णन.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)

सशक्त होईल. हे त्यांचे ह्मणणे अगदी खरे आहे, अशी आमचेच मन व प्रकृति साक्ष देतात. तसेच हिमाचलांत लहान मोठे दुसरे अनेक.दरे आहेत. पण त्या सर्वांत यासच भूस्वर्ग में पद प्राप्त होण्याचे कारण त्याची अद्भुत सृष्टिरचना में एक असले पाहिजे.
 आतां दुसन्या त-हेने याजविषयी विचार करूं. प्रत्येक देश बहुतकरून कांहीं उत्तम पदार्थ उत्पन्न करण्याविषयी प्रसिद्ध असतो, पण त्या . सर्वात काश्मिराप्रमाणे अत्युत्तम पदार्थ उत्पन्न होणारे देश फारच थोडे सांगता येतील. पहा, सर्व फळांमध्ये अति रुचिकर व सर्वीस प्रिय जे द्राक्षाफळ त्याचे तर हा देश मुख्य उत्पत्तिस्थान आहे. येथे उत्पन्न होणान्यासारखें, द्राक्ष स्वगत इंद्रास देखील मिळत नाही, असे राजतरंगिणीत .एका स्थळी म्हटले आहे. या शिवाय अनेक जातीची दुसरी स्वादिष्ट फळे येथे उत्पन्न होतात. त्यांचे वर्णन पुढे येणार आहे. त्याचप्रमाणे शेंकडों जातींचीं सुवासिक द्रव्ये आहेत, पण त्या सर्वांत केशर व कस्तुरी हा अग्रगण्य होत, व त्यांचेही मुख्य स्थान हाच देश होय. तसेच नेत्रांस आनंद देणारे जें सृष्टिसौंदर्य चाच्या संबंधाने पाहिले असतां हिमाचलरूप करंड्यांत हा देश एक रत्न आहे. असा रमणीय देश एशिया खडात नव्हे पण सर्व पृथ्वीच्या पाठीवर दुसरा नाही, असे आपल्या देशाचे प्रसिद्ध इतिहासकार एलफिन्स्तन ‘साहेब ह्मणतात. जनरल कनिंगहाम व सर रिचर्ड टेपल हे आपल्या ग्रंथांत या देशाच्या वनश्री देतात. त्यांचा उल्लेख पुढे येणार आहे.