पान:काश्मीर वर्णन.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



काश्मीर वर्णनं.


महत्व.


 जगांतील सर्व प्राण्यांचा व्यवहार मुख्यत्वे सुखप्राप्तीच्या आशेने चालला आहे. या सुखांत मानसिक व शारीरिक असे दोन भेद आहेत. या दोहोंचा अति निकट संबंधं आहे. त्यांत पहिल्या प्रकारचे सुख पुष्कळ अंशी दुस-यांवर अवलंबून राहते आणि हे दुसच्या जातीचे सुख शरीरसंपत्तीस व इंद्रियांस सुख देणारे पदार्थ यांच्या योगाने प्राप्त होते. या संबंधाने पाहिले असतां काश्मीर देशास भूस्वर्ग असे जे विद्वान् लोकांनी नांव दिले आहे, ते अगदीं. यथार्थ आहे, असे पुढील वर्णनावरून लक्षांत येईल. तसेच कोणत्याही देशांतील लोकांच्या सुखास तेथील हवा आणि पाणी ही आद्य कारणे आहेत, असे एका ग्रंथकाराने ह्मटले आहे. या देशांतील हवा मोकळी, शीतल व आरोग्यकारक असून पाणी तर पर्वतांच्या गगनचुंबित शिखरांवरील बर्फ वितळून ते ओहोरूपाने खाली येत असल्याकारणाने अत्यंत. थंड, स्फटिकाप्रमाणे स्वच्छ व अमृतासारखे गोड असून ते लोहमिश्रत असल्यामुळे मोठे पाचक व पौष्टिक आहे. या .. हवापाण्याचे संबंधानें : ए० वुइलसन् नांवाचे गृहस्थ आपल्या ग्रंथांत असे ह्मणतात की, कोणी मरण्यास टेकलेलं माणूस या भूस्वर्गी वसंतऋतूत जाऊन राहील तर त्याच्या प्रकृतीसही निःसंशय आराम पडून तो पूर्ववत्