पान:काश्मीर वर्णन.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३)

आतां प्रपंचांतील . सर्व सुखास कारणीभूत जी कांता तिच्या संबंधाने पाहिले असतांही या देशास विशेष मान दिला पाहिजे. कारण, येथील स्त्रियांस त्यांचे अप्रतिम लावण्यावरून कित्येक कवींनी साक्षात् अप्सरांची उपमा दिली आहे. या लावण्यखाणीचे विशेष वर्णन पुढे देणार आहों.
आतां विद्येच्या संबंधाने आपण या देशाविषयी विचार करू. सर्व विद्यांचे मुख्य स्थान में सरस्वतीपीठ ते याच देशांत होते असे विद्वान् लोकांचे मत आहे. या देशाच्या पश्चिमेस श्रीनगरापासून सुमारे शंभर मैलांवर शारदा नांवाचा एक प्रांत आहे. तेथेच हे पीठ असावे असे अनुमान करितात, म्हणून आह्मांस पंडित महानंदस्वामि यानी सांगितले. हे गृहस्थ श्रीनगर येथील इंग्रजी शाळेत संकृताचे अध्यापक आहेत. यांचे वडील दामोदर पंडित हे सर्व शाखांत मोठे धुरीण होते. एलफिन्स्तन् विद्यालयाचे माजी संस्कृत प्रोफेसर डाक्तर बुलर हे या देशांत संस्कृत पुस्तकांचा शोध करण्यास गेले होते, तेव्हा हे पंडित हयात होते. यांची व दुस-या पंडितांची डा० साहेबानी आपल्या ग्रंथांत बहुत प्रशंसा केली आहे. हे पीठ याच देशांत होते असे ह्मणण्यास वरीलपेक्षा बलवत्तर आणखी एक आधार मिळाला आहे तो असा की, तंत्रशास्त्रांत या देशाच्या मर्यादा सांगतांना पुढे दिलेले वाक्य लिहिले आहे. "शारदामठमारभ्य कुंकुमाद्रितटांतकः" काश्मीर देशाचा आरंभ शारदामठापासून तों कुंकुम (केशराचे ) पर्वताचे शेवटापर्यंत." तसेच इ० स० १०, ११, १२ या शंतकांत विव्दन्ते