पान:काश्मीर वर्णन.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३ )। विस्मय वाटला. असो. नंतर आह्मी येथील किल्ला पहावयास गेलो; पण आमच्या जवळ पास नसल्यामुळे शिपायाने आह्मांस आंत सोडले नाही. तेव्हां तपास करितां दोनटांकी व एक देवालय याहून पाहण्यासारखे तेथे कांहीं विशेष नाही असे समजले. किल्लयाचा परिघ सुमारे तीन मैल असून आंत जाण्यास तीन दरवाजे राखिले आहेत. त्यांतील एकास काटीदरवाजा असे ह्मणतात. याच्या तटाची उंची सुमारे २० हात असून १०० हातांच्या अंतरावर बुरूज बांधले आहेत. हा किल्ला अकबर बादशहाने इ० स० १५९० मध्ये बांधिला व त्यास एक कोट रुपये खर्च आला असे काटी दरवाज्यावर जो परशियन भाषेत लेख आहे, त्यांत लिहिले आहे ह्मणून मागून समजले. येथे एका उंच स्थळीं कांहीं काल उभे राहून भोंवतालचा रमणीय देखावा पाहिला आणि खाली उतरलो. - पुढे वितस्तेच्या कांठीं येऊन किस्तीत बसलो आणि शाली व त्यांचे माग पहावयास संमदशाह व अहंमदशाह यांचे दुकानों जावयास निघालों. ही दुकानें वितस्तेच्या अगदी कांठीं असून तीन चार मजली आहेत. दुकानदार लोक बहुतकरून दुसन्या किंवा तिस-या मजल्यांत बसतात. हे लोक मोठे धूर्त व आर्जवी असतात आणि किस्तांतून जाणा-या येणा-या मुशाफरावर नजर ठेवून त्याच्या डामडौलावरून तो माल खरेदी करणारा आहे किंवा कसे हे तेव्हांच ओळखतात. तो खरेदी करणारा आहे असे वाटल्यास दुकानी येऊन माल पाहाण्यास व खरेदी करण्यास मोठ्या आगत्याने त्यास बोला