पान:काश्मीर वर्णन.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ८२ )

लागतें, आह्मीं नांतून आलों ही निव्वळ चूक केली असे आह्मांस दिसून आलें. कारण, ही चढण ह्मणण्यासारखी मुळींच कठीण नाहीं. सारे दोन तीनशें फूट चढावें एवढें चढण्यास आमचे आंगांत ताकद होती. पर्वताकडे जात असलेले पाहून शेजारचे खेड्यांतील लांब दाढीचे दहा बारा पंडित व त्यांचे कांहीं छोकरे आह्मां मागून येऊं लागले. यांतील एका दोघांचे हाती पूजेचें सामान, पाणी व पोथी हीं होतीं. आह्मीं चढून वर गेलों तों, ही पंडित मंडळी आह्मांजवळ येऊन उभी राहिलो आणि त्यांनी आझांस सारिका देवीजवळ नेलें. देवीच्या नावावरून यास सारिका पर्वत असेही ह्मणतात. . येथें त्यांच्या सूचनेप्रमाणे बूट काढून पादप्रक्षालन | केले आणि देवीजवळ एका कुशासनावर जाऊन बसलों. ही देवी ह्मणजे एक मोठी शिला असून तिजवर शेंदूर | फासला आहे. एक बुट्टे पंडितजी पोथी वाचून आह्मांस पूजा सांगू लागले. त्याप्रमाणें आह्नीं सर्व पूजा केली. हा सर्व पूजाविधि संस्कृत भाषेंत लिहिला असून त्यांत क्वचित् परकी शब्द येत, ते काश्मीरी भाषेतील असावेत असें आह्मांस वाटलें. पुढे कश्यप ऋषीनी ज्या स्थळीं तपश्चर्या केली तें हेंच व त्यांस हीच देवी प्रसन्न झाली ह्मणून त्यांनीं सांगितलें आणि देवीवरील चार फुले काढून आह्मांस प्रसाद ह्मणून दिली. आह्नीं त्या सर्वांस नमस्कार करून व कांहीं दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घेतला. अजमीर सोडल्यापासून गुडमार्निंगवर आमचा सर्वांशीं व्यवहार चालू होता. पण येथें मात्र नमस्कार करण्या चा बरेच दिवसांनी प्रसंग आलेला पाहून मनास मोठा