पान:काश्मीर वर्णन.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ८१ )

( भूकंप होण्याची सूचना देणारें यंत्र ) आह्मांस दाखविलें. हे यंत्र आह्मीं पूर्वी कधीं पाहिले नव्हतें. राजवाड्या- च्या सदरेच्या भिंतीस सांबर, काळवीट व दुसरे वन- पशु यांची लांब व पुष्कळ फांटे फुटलेली शिंगें लावून. ठेविली आहेत. आह्मीं या देशीं आल्याचे पूर्व वर्षी आपल्या देशाचे व्हाईसराय साहेब हा देश पहावयास गेले होते. त्यांस राहण्यास महाराजांनी हाच वाडा दिला होता. तेथून आह्मीं वारादारी नांवाचा बंगला पहावयास गेलों. ही इमारत शेख बागेच्या समोर आहे. महाराज व त्यांचे प्रतिष्ठित पाहुणे यांजकरितां ही तयार केली आहे. हिच्या छताचें काम पाहण्यासारखें सुंदर असून हिच्या दोहोंबाजूंस दोन घुमटाच्या आकृतीचे बंगले बांधिले आहेत. सरकारी दवाखाना व थोरलें पोस्ट- आफिस हीं येथून जवळच आहेत. दवाखाना पाहावयास सकाळी आले पाहिजे असें आमच्या बरोबर आलेल्या मनुष्यानें सांगितलें. आह्मी तिकडे न जातां हाजारी नांवाचा बाग पहावयास गेलों. सांप्रत महाराजाचे वडील जे रणवीरसिंग ह्यांनी हा तयार करविला होता. येथील इमारतीचें काम वरील बारादारी बंगल्याप्रमाणें चांगले सुरेख आहे. येथें निरनिराळ्या जातींचे फलपु- प्पवृक्ष व वेली असून त्यांच्या योगानें या स्थलास मोठी शोभा आली आहे.

आह्मीं भोजनोत्तर झंपानांत बसून हरिपर्वत (टेकडी)

पाहण्यास गेलों. प्रद्युम्न नांवाचें स्थान याच टेकडीवर होतें ह्मणून सांगतात. ही टेकडी श्रीनगरच्या उत्त- रेस आहे. आह्मीं पायथ्याजवळ गेलों, तेव्हां झंपा- -