पान:काश्मीर वर्णन.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(८० )

लागते. तीत सर्व प्रकारच्या मालाची दुकानें आहेत. यांतील कांहीत लोंकर किंवा केस असलेल्या चर्माचे यांच्या किंमतीचा चार रुपये पडतात कोट विक्रीस ठेविलेले दृष्टीस पडले. तपास करितां मध्यमशा कोटास तीन ह्मणून समजलें.

वर सांगितलेल्या पेठेंतून आझी लालमंडी नांवाचा

महाराजांचा दुसरा वाडा पहावयास गेलों. सुमारें चार हातांपेक्षा अधिक उंचीच्या चौथऱ्यावर हा वाडा बांधिला आहे. याच्या पहिल्या मजल्याचें सर्व काम दगड, पक्कया विटा व चुना यांचें केले आहे. शेरगडी राज- वाड्यापेक्षां या वाड्यांतील मजल्याचें काम अधिक उंच याव- कारण, दिले असून वरच्या बाजूस सज्जे राखिले आहेत. रून सर्व शहराचा व आसमंतांतील भागांचा देखावा मोठा रमणीय दिसतो. यांतील दिवाणखान्याची उंची व रुंदी पाहून आह्मांस फार आश्चर्य वाटलें. आपल्या देशांतील लाखो रुपये खर्चून बांधलेले राजवाडे व बंगले आह्मीं पाहिले आहेत. पण त्यांतील दिवाणखाने एवढे उंच व रुंद नाहींत. तसेंच या दोन्ही राजवा- ड्यांतील दिवाणखान्यांच्या भिंती व छतें यांजवर जसें सुरेख सोनेरी वेलबुटीचें व नक्षीचें बारीक काम केलेले आहे, तसें दिल्ली, आग्रा येथील कांहीं इमारतीवर मात्र दृष्टीस पडतें. या वाड्याच्या सभोंवार बगीचा असून त्यांत नाना प्रकारचे पुष्पवृक्ष व वेली लाविल्या आहेत. या बगीच्यांत लहानसे दोन तीन बंगले असून त्यांत कांही यंत्रें ठेविली आहेत. त्यांजवर एक तरुण पंडित कामगार नेमिला आहे. या गृहस्थानें डेसिमेटर