पान:काश्मीर वर्णन.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ७९ )

४०० व रुंदी २०० यार्ड असून त्याच्या तटाची उंची २२ फूट आहे व सभोंवतीं मजबूत बुरूज बांधिले आहेत. राजवाड्यांत मोठमोठाले दिवाणखाने व कचे- व्याच्या जागा आहेत. याच्या पूर्वेकडून वितस्ता नदी वाहात असून उत्तरेस कुंटिकुल नांवाचा कालवा आहे. रायबहादूर पंडित सुराजकोल सिनिअर सेंबर यांचें राहणें व कचेरी ही याच वाड्यांत आहेत. या सद्गृह स्थांनी या वाड्याच्या आवारांत आह्मांस राहण्यास जागा दिली होती. या वाड्याचें सर्व काम दगड, पक्कचा विटा, व लांकडें यांचें केलें आहे. या वाड्यास लागूनच दुसरा वाडा बांधण्याचें काम चालू असून त्यास पांच सहा लक्ष रुपये खर्च होणार असे समजलें. याच्या खालच्या बाजूस महाराजका मंदिर नांवाचें एक देवालय असून त्यांत राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ति आहेत. या मंदिराचें शिखर सोन्याच्या पातळ पत्र्यांनी मढविलें आहे. हा सर्व राजवाडा तीन चार मजली असून शहराचा देखावा पाहण्यास याजवर कांहीं उबड़े सज्जे राखिले आहेत. वाड्यास लागून खालच्या बाजूस एक बऱ्याच लांबीचा घाट बांधिला असून त्याजवर जाण्यास पूर्वाभि मुखी दोन द्वारें ठेविली आहेत. घाटाच्या समोर पली- कडच्या तीरीं वाफेच्या योगानें चालणाऱ्या दोन तीन किस्त्या (स्टीमबोट्स ) उभ्या आहेत. यांपैकी एक हिंदुस्थानचे लाट साहेब यांनी महाराजास नजर केली असून दुसऱ्या दोन तिच्या नमुन्यावर महाराजांनी तयार करविल्या असल्याचें समजलें. वाड्याच्या बाहेर पडून पांच पन्नास पावलें आलें कीं, एक मोठी दुतर्फा पेठ