पान:काश्मीर वर्णन.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(७८)

असें त्यांस लावले असलेल्या दगडांवरून दिसून येतें. कांहीं जुन्या मशिदींतही असाच प्रकार झालेला दिसतो, असो. घाटांच्या वरच्या बाजूस प्रवाहाशी समांतर जाणारे रस्ते असून त्यांजवर राजवाडे, मंदिरें, मशिदी, लोकांचीं लहान मोठीं घरें व दुकानें दुतर्फा लागून गेलीं आहेत. नदीच्या सपाटीपेक्षां शहराची सपाटी दहा पंधरा फुटापेक्षां अधिक उंच नसल्यामुळे तिजवरील घाटांच्या पाययांची संख्या दहा पंधरापेक्षां अधिक नाहीं. बरामुला नांवाचे गांवाहून श्रीनगर ३४ मैल अस- ल्याचें पूर्वी सांगितलेच आहे. येथून वरच्या बाजूस इस्लामवाद गांव सुमारें ३३ मैल आहे. या प्रदेशांत व्यापारी लोकांच्या किस्त्या ५,००० वर आहेत. या- शिवाय लोकांच्या खाजगी त्या वेगळ्याच. अकबर बादशहाच्या वेळी येथें ८,९०० किस्त्या खेळत होत्या असा लेख आहे. येथील रस्ते एकंदरींत फार अरूंद व घाणेरे आहेत. त्यांत लहान रस्त्यांवर तर इतका दुर्गंध येत असतो कीं त्यांवरून जातां येतां प्रवाशाच्या मनास मोठी खंत उत्पन्न होते. शहरांत घोड्यांची किंवा बैलांची गाडी आमच्या नजरेस तर पडली नाहीं, याचें कारण रस्ते चिंचोळे हें असावे असे वाटतें. किस्ती हें येथील मुख्य वाहन होय.

येथें महाराजास राहण्याकरितां राजवाडे व बगीचे

बरेच तयार केलेले आहेत. शेरगडी नांवाची एक विस्तीर्ण जागा वितस्तेच्या डावे कांठी आमीरकदल नांवाच्या पहिल्या पुलाच्या वरच्या बाजूस आहे. शहराचा किल्ला व राजवाडा आहे. याची लांबी तींत