पान:काश्मीर वर्णन.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

( ७७ ) रामाची मंदिरेही बरीच आहेत. त्यांचे वर्णन पुढे दिले आहे. श्रीनगर, कोणत्याही देशाचे वर्णन देतेवेळी त्यांतील मुख्य शहराची माहिती देणे विशेष आवश्यक आहे, करितां या देशांतील मुख्य शहर में श्रीनगर त्याजविषयीं कांहीं माहिती देतो. काश्मीर देशाची एका इंग्लिश ग्रंथकाराने नेपल्स प्रांताशी तुलना करून श्रीनगरास फ्लारेन्स शहराची व वितस्तेस आनों नदीची उपमा दिली आहे. या शहरास सूर्यनगर असे दुसरे नांव आहे. तसेच मुसलमान लोक यास काश्मीर असेंही ह्मणतात. याची उंची समुद्राच्या सपाटीपासून ९,२०० फूट आहे. हैं शहर वितस्ता नदीच्या दोहों तीरांवर हरिपर्वताच्या पायथ्याजवळ वसले आहे. याची लांबी सुमारे दोन मैल आहे. शहराच्या एका भागांतून दुस-या भागांत जाण्यास नदीवर सात ठिकाणी पूल बांधिले आहेत. त्या सर्वांचे काम बहुतेक लांकडी असून त्यांस निरनिराळी नांवे दिलेली आहेत. अकबर बादशाहाच्यावेळी येथे दोनच पूल होते. श्रीनगराजवळ प्रवाहाची रुंदी सुमारे नव्वद यार्ड व खोली सहा सात यार्ड असते. येथे सुमारे वीस हजार घरे असून लोक-) संख्या लाख सव्वा लाख आहे. पैकी आजमासे १ पंडित व बाकीचे बहुतेक यवन आहेत. नदीच्या दोहों तीरीं । जागोजाग घाट व धक्के बांधले आहेत. हिंदूची देवालये पाडून त्यांचे दगड आणून हे घाट तयार केले असावे