पान:काश्मीर वर्णन.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ७६ )

त्यास णस्थ, देशस्थ व कन्हाडे इत्यादि भेद नाहीत. पण बडे लोक व सामान्य लोक असे दोन वर्ग मानितात. पंडित लोक आपणांस ऋग्वेदी सारस्वत ब्राह्मण ह्मण- वितात. ते वेदशास्त्राचा अभ्यास करितात. आह्मीं एक दोघांस त्यांची शाखा कोणती ह्मणून विचारिलें. खतक ( पटक ) ह्मणून त्यांनी सांगितलें. आह्मी वैदिक 'धर्मानें चालतों असे हे पंडित लोक सांगतात, पण विशेष शोध करितां सोळा संस्कारांपैकी मौंजी, लग्न व मृत हे तीन संस्कार मात्र ते पाळितात व श्राहें करितात, असें समजून आलें. हे लोक शिव, दुर्गा, विष्णु, राम, गणपति यांची पूजा करितात व कोणी पंचायतनाची करितात. कांहीं पंडित तांत्रिक मार्गास विशेष मान देतात आणि ते देवीचे उपासक आहेत पण शैवोपासक अधिक आहेत. शिवरात्र व एकादशी हीं उपोषणें करितात व वितस्ता नदीस मोठी पवित्र मानून तींत स्नानें करितात. आपल्या देशाप्रमाणें ग्रहण पाळितात, ह्मणजे तें लागल्यावर व सुटल्यावर स्नानें करितात. या वेळी दानधर्म करि- तात व त्याच्या वेधांत अन्न ग्रहण करीत नाहीत. आह्मी कार्तिक शुद्ध पौर्णिमेचे ग्रहणास श्रीनगरी होतों, ह्मणून या संबंधानें थोडी विशेष माहिती मिळाली ती दिली आहे. पण हे सर्व पंडित मत्स्याहारी असून कपडे घालून भोजनास बसतात व घरांतील सर्व काम यवन लोक करितात. यावरून त्यांच्यांत सोवळें ओवळें पाहण्याचा प्रचार विशेष नाही असे दिसते. या लोकांत पुनर्विवाह चालू नाहीं. अमरनाथ व शंकरपर्वत हीं या देशांत दोन शिवस्थानें मुख्य असून श्रीनगर येथे