पान:काश्मीर वर्णन.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ७५ )

झाला. नाहीं. जाहले. त्यांच्या कथा इतिहास प्रकरणांत पुढें दिल्या आहेत. तसेंच नाग नांवांची सरोवरें व झरे या देशांत अनेक स्थली आहेत. त्यांचा उल्लेख समयविशेषीं पुढें केला आहे. पुढे या देशीं वैदिक धर्म चालू झाला. तो पुष्कळ वर्षे होता. नंतर येथील कित्येक राजांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तेव्हां त्या धर्माचा प्रसार तत्रापि वैदिक धर्म अगदीं नाहींसा जाहला कारण अशोक, मेघवाहन, ललितादिस इत्यादि राजे बौद्ध धर्माचे मोठे पुरस्कर्ते होते, तरी ते वैदिक धर्माचा द्वेष करीत नसत. इतकेच नव्हे पण त्याही धर्मास ते मान देत, असे त्यांच्या इतिहासा- वरून स्पष्ट दिसतें. वैदिक धर्माच्या अभिमानाने बौद्ध धर्माचा छळ करणारे किंवा बौद्ध धर्माच्या अभिमानानें वैदिक धर्माचा छळ करणारे असे राजे फार थोडे जाहले. यामुळे कमी अधिक मानानें दोन्ही धर्म चालू होते. या प्रमाणे शेंकडों वर्षे लोटलीं. पुढें मुसलमान राजे जाहले. त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार करण्याकरितां शेंकडों देवायें, मठ व विहार उध्वस्त केले, त्यातील मूर्ति छिन्न- विछिन्न केल्या आणि हजारों हिंदूंस व बौद्धांस जबरी- नें मुसलमान बनविले. तत्रापि हिंदू धर्म अगदी नष्ट | न होतां तो अद्याप चालूच आहे. बौद्ध धर्म मात्र एक लदाकू प्रांतांत राहिला आहे. त्याजविषयी थोडीशी माहिती पुढें दिली आहे. प्रतकाळी या देशीं मुसलमान लोकांचा मुख्य भरणा असल्याचें मागें सांगितलेंच आहे. हिंदू लोकांत पंडित हे प्रमुख आहेत. त्यांत आपल्याप्रमाणें कोक-