पान:काश्मीर वर्णन.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ७४ )

राज्ञी होती, तिच्या अभिलाषानें एका प्रधानानें राज्यपद बळकाविलें. तेव्हां त्याचा विश्वासघातकीपणा व कृतघ्नता हीं पाहून तिनें त्याची अत्यंत निर्भत्सना केली आणि आपल्या देहांत भोसका पाडून घेऊन प्राण सोडिला. प्राचीन काळी आपल्या देशांतील राजे व अलीकडे दिल्लीचे बादशाहा या देशांतील उत्तम रूपवान् मुली आणून त्यांस आपल्या जनानखान्यांत ठेवीत असत.

धर्म.

अति प्राचीन काळीं येथील लोक सर्पाची पूजा कर- णारे होते. इ० शकाच्या पूर्वी ६०० वर्षे जे सिथि- यन् लोक उत्तर हिंदुस्थानांत आले, त्यांच्यांतीलच हे लोक असावे असें पाश्चात्य लोकांचें अनुमान आहे. हिंदुस्थानच्या अगदी ईशान्य दिशेस जे लोक राहतात, त्यांस नाग अशी संज्ञा सांप्रतकालीं सुद्धां असल्याचें प्रसिद्ध आहे. चिनई लोकांच्या ग्रंथांत नाग लोकांच्या राजांचें व त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांचें वर्णन दिलेलें आहे. चीन देशांत नागाच्या (द्रेगन् ) पूजेची प्रवृत्ति व बौद्ध धर्माचा प्रसार हीं आपल्याच देशांतून गेली असावी असें कांहीं विद्वान् लोकांचें मत आहे. तसेंच पुष्कळ नाग राजांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला असल्याचे लेख आहेत. डा० हंटर यांचें असें मत आहे कीं, तक्षक व नाग हे लोक सर्प व वृक्ष यांची पूजा करीत. या देशाच्या सभोवतालच्या पर्वतांवर हे लोक राहत असत असे काश्मीर येथील लोकांचें मत आहे. या देशांतही नाग ( कर्कोट ) वंशांतील कांहीं राजे