पान:काश्मीर वर्णन.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ७३ )

वाटलें. या देशांत लोलाव दऱ्यांत तावी नदीच्या कांठी लालपूर व ठाणामंडी नांवांचीं गांवें आहेत. स्त्रियांची तारीफ तर कांहीं विलक्षणच करितात. या सौंदर्या- च्या संबंधानें राजतरंगिणींत बरेंच वर्णन आले आहे. यांतील कांहीं भाग प्रियवाचकांकरितां खाली देतों. “येथील स्त्रियांच्या ओष्ठांचा वर्ण द्राक्षासवासारखा आरक्त असून त्यांत अमृत असते; या स्त्रियांचें सौंदर्य बालचंद्राच्या सौंदर्यास मागें सारितें व ह्या अहश्चंद्रिका आहेत.” यांच्या या अप्रतिम सौंदर्यावरून एक ग्रंथकार या लोकां- स देवयोनीचे लोक असें ह्मणतो. या सौंदर्याचें मुख्य कारण येथील अप्रतिम हवापाणी हें होय, असे एका इंग्रजी ग्रंथकाराचें मत आहे. या प्रमाणे येथील लोकांच्या सौंदर्याचें अनेक विद्वानांनीं निरनिराळ्या प्रकारें वर्णन केले आहे. या देशास भूस्वर्ग असे जर नांव प्राप्त झाले आहे, तर येथील स्त्रियांस देवांगना किंवा अप्सरा ह्मणणे अगदी योग्य आहे.

आतां या लावण्याच्या संबंधानें एक गोष्ट सांगून

हें प्रकरण आटोपितों, एकाकाली पृथ्वीवरील लोक फार दुराचरणी झाले. तेव्हां त्यांस सुधारण्याकरितां देवांनीं स्वर्गांतून हरुत् व मरुत् नांवांचे दोन दूत पाठ- विले. ते येऊन या लोकांस सुधारण्याचें काम एकी- कडेच ठेवून उलट ते येथील स्त्रियांच्या लावण्यास भुलून त्यांच्या पाशांत सांपडले. विषयसुखाच्या इच्छेनें निरनिराळ्या देशांतील राजांनी अनेक यत्न करून येथील स्त्रिया प्राप्त करून घेतल्याची उदाहरणें बहुत आहेत. राजपुताना नांवाची एक अतिरूपवती येथील 7