पान:काश्मीर वर्णन.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७२ )

व गौर वर्णाचे नाहीत. यांत शियापेक्षां सुनीपंथाचे लोक अधिक आहेत. हे लोक व्यापार, शेतकी व दुसरे उत्पा- दक धंदे किंवा मोलमजुरी करितात. कांहीं सरकारांत शिपाईगिरीचें काम करितात. कांहीं नावा चालविण्याचे किंवा दुसरे धंदे करून निर्वाह करितात. यांतील थोडे- बहुत सरकारी अधिकारी व व्यापारी आहेत. पंडित लोक मुख्यत्वें सरकारी नोकऱ्या करितात. पण त्यांत- ही व्यापार व दुसरे धंदे करणारे आहेत.
 येथील स्त्रियांच्या सौंदर्याची प्रसिद्धि सर्वत्र आहे. त्या स्त्रिया पंडितांच्या बायका व मुली होत. पण या लोकांत गोषा फार चालू असल्यामुळे श्रीमान् व थोर लोकांच्या बायका आह्मांस कोठून दृष्टीस पडणार ! तत्रा- पि श्रीनगरांत एके दिवशीं फिरत असतां पंडितांच्या बायकांचा मेळा कांहीं समारंभा निमित्त रस्त्यानें जात असतां आह्मी पाहिला. त्यावरून व गरीब पंडितांच्या बायका व मुली वित्तस्तेच्या कांठी पाणी भरण्यास, भांडीं उजळण्यास व धुणी धुण्यास येत असत; त्या आमच्या नेहमी दृष्टीस पडत, त्यावरून त्यांच्या लावण्याविषयीं जी प्रसिद्ध आहे ती अगदीं यथार्थ आहे असें आह्मांस वाटलें. त्यांचा बांधा सुबक, नेत्र हरणी सारखे पाणीदार व टप्पोरे, नासिका सरळ, कपाळ मोठें, भिवया रेखल्या सारख्या कोरीव, वर्ण अतिगौर, केस काळेभोर, लांब व दाट असून त्यांचे सात, नउ पेड वळून वेण्या घालितात आणि त्यांत फुलपाखराच्या आकाराचे दागिने घालितात. याप्रमाणें रेखल्या सारखे सुंदर त्यांचे अवयव पाहून पंडिताची स्त्री ह्मणजे लावण्याची खाणच होय असें आह्मांस