पान:काश्मीर वर्णन.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(७१)

पाठवितात. शालीच्या संबंधानें मिळाली तेवढी माहिती दिली आहे. या शिवाय लहान मोठ्या किंमतीचे चोगे,। चादरी, मलीदे, पश्मीना, टेबलावरील कपडे, पहू, दुलया, कोट, लुई ( बहुमोलाचें कांबळें), टोप्या, गळपट्टे इत्यादि येथें तयार करितात. शाली, तिचे पदर, किनारी आणि वर सांगितलेले दुसरे कपडे तयार करणारे लोक बहुतेक यवन असून त्यांस मजुरी फार थोडी मिळते. यामुळे ते अगदर्दी दरिद्रावस्थेत आहेत. शालीच्या धंद्यास मंदी आल्यामुळे कांहीं लोक गालीचे विणूं लागले आहेत. श्रीनगरच्या दक्षिणेस सुमारें वीस मैलांवर बाह- तोर नांवाचें एक गांव आहे. तेथें निरनिराळ्या रंगांचे लोंकरी उमदे हातमोजे व पायमोजे तयार होतात. लोक. आपल्या देशाप्रमाणे या देशांतही हिंदू व मुसलमान | या दोन मुख्य जाति आहेत. त्यांत मुसलमानांचा भरणा फार मोठा आहे. येथें मुसलमानांचा अमल शेकडो वर्षे झाल्यामुळे बहुतेक हिंदू खाण्यापिण्यांत व रितीभातीत अर्धे मुसलमान बनले आहेत. यांत पंडित हे प्रमुख आहेत. हे लोक उंच, सुदृढ, निरोगी व देखणे आहेत. यांचा वर्ण गौर असून चित्तवृत्ति मोठी आनंदी असते. देशांतील लहानमोठे अधिकार बहुतेकअंशी याच लोकां- कडे आहेत. यांतील कांहीं लोक व्यापारधंदा व दुसरे उद्योग करितात. यवन लोकांपेक्षां हे लोक अधिक सुखी असावेत असे दिसतें. यवन लोकही पंडितां प्रमाणेंच उंच, सुदृढ व निरोगी आहेत. पण तसे देखणे