पान:काश्मीर वर्णन.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७० )

 पूर्वकाल या धंद्यास फारच तेजी होती. मोंगल बादशाहाच्या वेळी येथें शालीचा चाळीस हजार माग चालू होता. पुढें अफगाण लोकांच्या वेळी सोळा हजार होता. या प्रमाणें या धंद्यास मंदी येत गेली तरी इ० स० १८६० सालीं येथें तीन हजार माग चालू असून सुमारें पंचवीस लाख रुपये किंमतीच्या शाली एक युरोप खंडांत विकरीस गेल्या. इ० स० १८७० त. जर्मनीफ्रान्स या दोन देशांमध्ये जी लढाई झाली तिच्या योगानें या धंद्यास फार मोठा धक्का बसला. तसेंच अली- कडे वीस पंचवीस वर्षांत इंग्लंडफ्रान्स येथें शाली तयार करूं लागले आहेत. त्या दिसण्यांत काश्मीरी प्रमाणे असून किंमतीस फार कमी असल्यामुळे त्यांचा खप विशेष होऊं लागला आहे. यामुळे या देशांतील शालींचा धंदा मंदावत चालला आहे. तत्रापि आज- मितीस येथे सुमारे दोन हजार माग चालू असून वीस पंचवीस लक्ष किंमतीच्या शाली तयार होतात. त्यांपैकी आठ नऊ लक्षांच्या युरोप खंडांत व बाकीच्या आपल्या व दुसऱ्या देशी जातात. पांचशेहून अधिक किंमतीच्या शाली काढितात, त्या युरोप खंडांत विक्रीस जातात. त्याहून कमी किंमतीच्या आपल्या देशांत येतात. युरोप खंडांत ज्या शाली जातात त्याचें मुख्य गि-हाईक फ्रेंच लोक होत. बाहेर देशीं ज्या शाली विकरीस जातात, त्यांजवर महाराजांची जबर जकात आहे. ही जकात सर- कारी उत्पन्नाची एक मोठी बाब आहे. रणजितसिंगाच्या वेळीं जकातीच्या ऐवजी शालीच घेत असत. येथील महा- राज दरसाल बहुमोलाच्या तीन शाली महाराणीस नजर