पान:काश्मीर वर्णन.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६९ )

घराच्या आंतील भागांत चालू असतें पण तिचा पदर व किनारी हीं कारागीर लोक घराच्या ओट्यावर किंवा दुकानांत बसून तयार करीत असलेले रस्तोरस्ती दृष्टीस पडतात.
 मौल्यवान् शालीस लागणारी लोंकर तिबेट देशांतून आणितात. सुमारे आठशे उंटांचे ओझें होईल एवढी लोंकर तिबेट देशांतून दरसाल येते. तींतून लांब तंतूची, रेशमासारखी मृदु, पांढरी शुभ्र व तजेलदार अशी निव- डून काढून तिचा उपयोग अति मौल्यवान् शाल तयार करण्यांत करितात. तिला पश्मिन ह्मणतात. ही उत्तम लोंकर दर' रूपयास एक तोळा मिळते. दहा बारा हजार फुटांपेक्षा अधिक उंच पर्वतांवर राहणाऱ्या बकऱ्यांच्या लोंकरीच्या मौल्यवान् शाली तयार करितात. नीच टेंकड्यांवर राहणाऱ्या बकऱ्यांची लोकर सरासरी असते, करितां तिचा उपयोग कमी किंमतीच्या शालीकडे करितात. ती पांढरी व पिंगट अशा दोन रंगांची असते. ती पिंजण्याचें काम बहुतकरून बायका करितात. शाली। विणून तयार झाल्यावर त्या थोडे दिवस वापरून काश्मी-रांत कांही प्रसिद्ध झरे आहेत, त्यांतील पाण्यांत नेऊन धुतात. तेणेंकरून त्या अधिक मृदु होऊन त्यांचा रंग विशेष खुलतो. त्या धुण्याचें कसब सर्वांस चांगलें साधत नाहीं. ज्या शाली विकरीस बाहेर पाठवितात त्यांतील एक चतुर्थांश किंवा पंचमांश तरी वापरून धुतलेल्या असतात. दल सरोवराच्या कांठी बदमर्ग झणून एक लहान खेडें आहे. त्याच्या जवळ या शाली धुण्याचे काम चालू असतें.