पान:काश्मीर वर्णन.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६८ )

वाढत असते व अशाच प्रकारच्या शालीस येथील लोक अधिक मान देतात. शालीच्या पदरावर व किनारीवर नकशीची व वेलबुटीचीं जीं कामें करितात तीं शंकर पर्वता खालून वितस्ता जीं चमत्कारिक वळणें घेऊन वाहते ती वळणें व या देशांतील सुंदर वेली या दोहोंच्या नमुन्यावर तयार करितात. शाल विणून तयार झाली ह्मणजे तिला पदर व किनारी जोडण्याचें काम अखेर करितात. या शालीच्या विणकरीचा आणखी एक प्रकार आहे. तो कोणास खरा सुद्धां वाटणार नाहीं. पण तो आ प्रत्यक्ष पाहिला, करितां त्याजविषयीं दोन शब्द लिहितों. कारागिरास जेवढी लांब व रुंद शाल काढण्याची असेल तेवढ़ीस पुरण्यासारखें एकेक चौरस फूट लांबी रुंदीचे तुकडे तयार करून ते अशा बेमालूम रीतीनें सांधितात कीं, ते सांधे पाहणाऱ्याच्या एकाएकी लक्षांत सुद्धां येत नाहींत. अमृतसर येथेही श्रीनगर प्रमाणें शाली तयार करण्याचे हजारों माग चालू असून मोठमोठ्या किंमतीच्या शाली तयार करितात. पण श्रीनगरांत तयार होणाऱ्या शालींच्या संबंधानें येथील शाली डावा हात होत. याचें मुख्य कारण तसें पाणी दुसरीकडे नाहीं व रंगाचें कामही काश्मीराप्रमाणें उत्तम साधत नाहीं असें ह्मणतात. पंजाबात लुधिआना, सियालकोट, रामपूर, गुरदासपूर इत्यादि गांवीं शाली काढण्याचे काम बरेच चालते. येथील विणणारे लोक मुळचे काश्मीरी आहेत. रामपूर हे शहर शालीपेक्षां उमद्या चादरी तयार करण्याकरितां विशेष प्रसिद्ध आहे. श्रीनगरअमृतसर येथें शाली तयार करण्याचें काम