पान:काश्मीर वर्णन.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६७ )

तसेंच एका जातीच्या गवताचे जोडे येथे तयार करितात. तो दोन तीन पैशांस मिळतो ह्मणून गरीब लोक त्याचा फार उपयोग करितात. हा जोडा घालून बर्फावरून चाललें असतां पाय फार निसरत नाहीत व त्यांचा बचावही बराच होतो.

शाली.

 या देशांतील शालीची प्रसिद्धि हजारों वर्षांपासून पृथ्वीवर गाजत आहे. ही तयार करण्याचें मुख्य काम ह्मणजे तिचा नमुना तयार करणें हें होय. या शालींत दोन प्रकार आहेत. एक मागावर विणलेली व दुसरी हातानें काढिलेली. पहिल्यास तिलिका व दुसऱ्यास अम्लिकल असें ह्मणतात. पहिल्या प्रकारची शाल तयार करण्यास दुसऱ्यापेक्षां चौपट किंवा आठपट जास्त श्रम घ्यावे लागतात व ती दोन शेवटांकडून विणीत जाऊन मधलें काम अखेर तयार करितात ; ह्मणून तिला किंमत फार अधिक पडते व ती जास्त टिकाऊ असते; पण हाताने काढलेल्या शाली प्रथम दर्शनीं विशेष भव- केदार दिसतात. सांप्रत दोन हजार रुपयांपेक्षां जास्त किंमतीच्या शाली फार तयार करीत नाहींत. बहुमोल किंमतीच्या शाली युरोप खंडांत विकरीस जातात. कोणी फरमास केल्यास पांच पासून दहा हजार पर्यंत किंमतीची शाल काढून देण्यास येथील व्यापारी तयार आहेत. या अतिमोल किंमतीच्या शालीत कलावतूचें काम फार असत असेल असें कोणासही वाटणार, परंतु तसे मुळींच नसून शालीची किंमत वाढते ती तिजवर केलेल्या कामामुळे