पान:काश्मीर वर्णन.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६५ )
शिकार.

 हा देश डोंगराळ असून चोहोकडे वृक्षांच्या दाट झाडीनें व्याप्त असल्यामुळे याच्या बहुतेक भागांत शिकार सांपडते. पण गिलजित्, स्कार्टू, लदाक, वर्दवानकिस्तचार या स्थलांच्या पलीकडील प्रदेशांत ती विशेष सांपडते. पुष्कळ साहेब लोक या देशांत केवळ शिकारीच्या उद्देशानें जातात. शिकारीचे येथें दोन हंगाम आहेत. पहिला मार्च महिन्याच्या मध्यापासून तों जूनच्या मध्यापर्यंत व दुसरा सप्टेंबरपासून नोव्हेंबरपर्यंत. लंका द्वीपांत मुख्य शिकार जशी हत्तीची तशी येथें अस्वलाची. त्यांत पिंगट अस्वलापेक्षां काळ्याची शिकार करणें अधिक कठीण व धोक्याचें आहे. ती करण्यास शिकारी मोठा तरबेज व धट्टाकट्टा असला पाहिजे. कारण पर्वतांच्या कड्यांवरून अति विकट मार्गानें खालीं दऱ्यांत उतरण्याचे किंवा दयांतील निविड झाडींतूनं वर चढण्याचे प्रसंग त्यास वारंवार येतात. जेव्हां उंच कड्यावरून खालीं दऱ्यांत शिकार दृष्टीस पडते, तेव्हां उताणें पडून पाठीनें घसरत त्यास तळाशीं जावें लागतें. काळ्या अस्वलांची शिकार करीत त्यांच्या मागे लागले असतां तीं प्रसंगीं शिकाऱ्याच्या आंगावर एकाएकीं मागें उलटून त्यास मिठी मारण्याच्या तयारीनें मागल्या दोन पायांवर उभी राहतात. तेव्हां त्यांच्या छातीवर घोड्याच्या नालाकृति पांढरा वाण असतो, तो सहजच दृष्टीस पडतो. शिकारी तरबेज असला ह्मणजे लगेच तो नाल रोखून गोळी घालितो आणि त्यास एकदम चित करितो. जखमी