पान:काश्मीर वर्णन.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६४ )

दुसऱ्या स्थलांत सांपडतो. डोंगरी बकऱ्यांत दोन भेद, आहेत. एकास सारन् व दुसऱ्यास सार अशीं नांवें आहेत. याची आणखी एक जात आहे. तीस इंग्रजीत “इबेक्स्" असें ह्मणतात. हा बकरा पर्वतांच्या उंच भागांत सर्वत्र आढळतो. याचीं शिंगें चार सव्वा चार फूट लांब असतात. याच्या पोटावरची लोंकर मऊ व तजेलदार असते; ती मिळविण्यास याची शिकार करितात. या लोकरीचें एक विशेष कापड करितात, त्यास " तुसी" असें झणतात व तिचे हातमोजे व पाय- मोजेही चांगले होतात. याच्या केसांच्या ब्ल्यांकेटी चांगल्या होतात. हा बकरा मोठा धीट व चपल असतो. तो हरिणाप्रमाणें उड्डाणें मारीत पळून जातो.
 ज्या बक-याच्या लोकरीच्या शाली करितात तो बहु- तेक अंशीं अन्य वकऱ्यासारखा असतो.पण त्याच्या पोटावरचे केस गुडघ्यापर्यंत खाली लोंबत असतात व त्याचें शेंपूट जाड पण अखूड असतें. याची शिंगें लांब, चपटी व कांहीं बाकदार असतात. अंगोरा येथील बक- यांपेक्षां येथील बकऱ्यांचे केस अधिक लांब, बारीक व मृदु असतात. पण ते तिबेटांतील वकयांच्या केसांची बरोबरी करूं शकत नाहीं, करितां फार मौल्यवान् शाली तयार करण्यास लोंकर त्या देशांतून आणितात. एका बकऱ्याची चांगली लोंकर साडेसात तोळे निघते. लहान ओझी वाहण्याच्या कामी या देशांत बकऱ्यांचाच उपयोग करितात. काश्मीरअंगोरा येथील बकऱ्यांच्या युग्मापासून नवीन उत्पत्ति करण्याचा यत्न इंग्लंदफ्रान्स या देशांत अलीकड़े चालू असल्याचे समजतें.