पान:काश्मीर वर्णन.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ६३ )

आणि किसनगंगा या नद्यांच्या मधील प्रदेशांत सांप- डतो. याची शिकार साधण्यास याच्या मागून पुष्कळ फिरावें लागतें. दुसऱ्या जातीचा हरिण कुतप्यासारखा भकतो ह्मणून त्यास भोंकणारा हरिण ह्मणतात. याशिवाय चितळ, डांगळ, भेंकर व तांबड्या व काळ्या रंगांचे हरिण आढळतात. सांबर हा पशु हरिणाचीच एक जात आहे. सप्टेंबर महिना अर्धा गेला ह्मणजे हा सर्वत्र दृष्टीस पडूं लागतो. अक्टोबर महिन्यांत त्यास शिंगे फुटूं लागतात. याच महिन्यांत याच्या माद्या वाफेस येतात. तेव्हां हे पशु अरण्यांत ओरडत फिरत असलेले ऐकूं येतात. या पशूंस त्या देशांत बडासिंग असें ह्मणतात. दचिनपर नांवाच्या परगण्यांत हे प्राणी ! पुष्कळ आढळतात.

बकरे व मेंढे.

 यांच्या या देशांत अनेक जाति आहेत. त्यांतील एकीस इंग्रजीत "मार्कार" असें नांव आहे. हा दुर्गम व उंच पर्वतावर राहतो. उन्हाळ्यांत याचा रंग करडा - पिंगट असतो, तो हिवाळ्यांत मळकट पांढरा होऊन अखेर जांभळा पिंगट होतो. मोठ्या वाढलेल्या नरास लांब दाढी असते. यांच्या मानेपासून तों गुडध्यापर्यंत घोड्यांच्या आयालाप्रमाणें लांब केस असतात. तो पांच सहा फूट उंच वाढतो व त्याचीं शिंगें चार फुटा- पेक्षां अधिक लांब असतात. तीं मोठीं सुरेख दिसतात. याच्या मादीस दाढी असते, पण अयाळ नसते. हा पशु पिरपंजाल नांवाचे पर्वताच्या रांगांत व कांहीं