पान:काश्मीर वर्णन.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६२ )

मृग हा मुख्य होय. यांत दोन प्रकार आहेत. एक तिबेटी व दुसरा नेपू. हा अन्य मृगांपेक्षां लहान असतो. याच्या वरच्या जबड्यांत दोन सुळे दांत असतात. त्यांनीं तो झाडांचीं पानें, मुळे खणून खातो. याचे केस टणक व ताठ असून दाट असतात. याचे कान कांहीं मोठे, लांब व उभे असतात. पल्लेदार व उंच उड्डाण मारीत जाणें ही याची साधारण चाल होय. हा प्राणी मोठा भित्रा असतो व तो गुहेत राहतो. याचा रंग करडा तांबडा असतो. याचें मांस मोठें रुचकर असतें असें सांगतात. या मृगास काश्मीरी भाषेत कस्तुना असें ह्मणतात. याच्या पोटांत नाभी जवळ एक पिशवी असते. तींत कस्तुरी हा पदार्थ सांपडतो. तिचा वर्ण काळा असतो. हा मृग बसतो तेव्हां ज्या स्थलास त्याच्या नाभीचा स्पर्श होतो तेथील मृत्तिकेस कस्तुरी- प्रमाणें सुगंध येतो आणि ती मृत्तिका व्यापारी लोक खऱ्या कस्तुरींत मिसळ करितात व साधल्यास कस्तुरीच ह्मणून विकतात. वाडगामन नांवाच्या नाल्यांत व तिलेल दऱ्यांत हे मृग सांपडतात. पण तिबेट आणि नेपाळ या देशांत ते अधिक आहेत. यांची शिकार हिंवाळ्यांत करितात. ती करण्यास या देशी महाराजांची परवानगी घ्यावी लागते. याची मादी वर्षांतून दोन वेळां विते व तिला दर खेपेस दोन पिलें होतात. तीं धरून पाळली तर आंधळी होऊन मरतात असें सांगतात.
 हरिणांत एक जात आहे. तींतील हरिण साप खातो ह्मणून त्यास काश्मीर भाषेत मारखाव असें ह्मणतात. तो पिरपंजाल नांवाच्या पर्वताच्या रांगेत व जेलम