पान:काश्मीर वर्णन.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६१ )

ससाणा, बगळा, हंस, चकोर, कोकिल, बाज, कोंबडा, घार, घुबड, पारवा, कबुतर, राघू, कावळा, चंडोल, कवडा, बदक इत्यादि पक्षी येथें आढळतात. लदाक प्रांतांत) पांढरे कावळे असल्याचें ऐकिलें. बगळ्याच्या पंखांचे तुरे | व कलग्या करितात. हीं पंखें फार महाग विकतात. ज्यावेळी हा पक्षी आपली पंखें झाडतो, तेव्हां तीं जमा करण्याकरितां लोक फार टपून बसलेले असतात. याची पारध करण्याची बंदी आहे. बाजपक्षी आपण पोहत असतां दुसरे पक्षी धरून ते आपल्या धन्याकडे आणून पोहोंचविण्याचें त्यास शिक्षण येथें देतात. तसेंच रेशीम उत्पन्न करणारे किडे येथें पुष्कळ असून त्यांचें खाद्य जें, तुतीची पानें त्यांच्या वृक्षांची रगाडी आहे. अलीकडे येथील सरकारचें या काम विशेष लक्ष लागले असल्याचें समजतें. डास व माशा यांचा आगस्ट व सप्टेंबर महिन्यांत फार उपद्रव होतो ह्मणून सांगतात. येथें मधमाशा पुष्कळ असून उमदा मध पैदा होतो. दज्याच्या पूर्वेकडील खेड्यां- तील लोक ह्या माशा बाळगून मध तयार करितात. शुपियन नांवाच्या खेड्यांतील मधाची तेथें फार प्रसिद्धि आहे. सर्प व विंचू या विषारी जीवांचा या देशांत विशेष उपद्रव नाहीं असें ह्यटलें असतां चालेल. लहान मोठे मासे नद्या व सरोवरें यांत खेळत असतात. पण श्रीनगराजवळ वितस्तेंत, मार्तंड, वर्नागअनंत- नाग या स्थलीं ते धरण्याची मनाई आहे.

मृग.

 येथें मृगाच्या तीन चार जाति आहेत. यांत कस्तूरी
 6