Jump to content

पान:काश्मीर वर्णन.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६० )

याचे घ्राणेंद्रिय व कणेंद्रिय ही फार तीक्ष्ण आहेत पण यास चांगले दिसत नाही. यास झाडांवर चढतां येते. ती रात्री येऊन शेतातील पिकांची नासाडी करितात आणि आक्रोड व तुते पिकलीं ह्मणने त्यांचा फडशा उडवितात. लोलाब, सिंदलिदार नांवांच्या दन्यांत ती पुष्कळ आढळतात. त्याच्या मादीचा आकार नरापेक्षां लहान असतो. येथील घोडे मोठे धिप्पाड किंवा विशेष देखणे नसतात पण पेगू सारखे लहान व मजबूत बांध्याचे असतात. यांत बदकशानी घोड्यांची अधिक तारीफ करितात. पर्वतांवरून जलदीने व सावधपणाने ते जाऊ शकतात. असे जात असतां त्यांचा पाय कधी घसरत नाही. वितस्तेच्या कांठीं व पर्वतांच्या बाजूवर घोडीं, गाई, बैल, बकरीं व मेंढ्या ही जनावरे चरत असलेली वेळोवेळी दृष्टीस पडतात. गोवध या देशी अगदी बंद आहे. वर सांगितलेल्याशिवाय गुरल, लांडगे, कोल्हे, खोंकडे, कुत्रे, वानर, ससे इत्यादि पशु बरेच आढळतात. येथील बहुतेक जनावरांच्या आंगावरील केस लांब व दाट असतात. वनगाई व शामवा (वनबकरा ) हीं क्वचित् दृष्टीस पडतात.
 आह्मीं या देशांत प्रवास करीत असतां वृक्षांच्या दाट झाडींत व जलाशया समीप, पक्ष्यांचे कळप वरचेवर नजरेस पडत. पण आमच्या देशांतील कित्येक पक्ष्यांची नांवें ऐकून सुद्धा आह्मांस माहीत नाहीत, तेव्हां येथील पक्ष्यांची विशेष माहिती आह्मी कोठून देणार ! : तत्रापि जे पक्षी आमच्या पाहण्यांत आले त्यांतील कांहींची नांवें सांगून हे प्रकरण पुरे करितो. मोर, गिधाड,